भरधाव रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 11:16 PM2019-07-13T23:16:48+5:302019-07-13T23:17:05+5:30

भरधाव लोडिंग रिक्षाच्या धडकेत २२ वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात घडली.

Two wheelers injured in rickshaw rickshaw | भरधाव रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

भरधाव रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

googlenewsNext

वाळूज महानगर : भरधाव लोडिंग रिक्षाच्या धडकेत २२ वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात घडली. अमोल देवचंद गायकवाड, असे जखमी तरुणाचे नाव आहे.


अमोल गायकवाड हा वाळूज एमआयडीसीत फॅब्रिकेशनचे काम करतो. शनिवारी दुपारी तो मित्रासह दुचाकीवरुन (एमएच-२०, बीएस-३९०८) पंढरपूरकडून रांजणगावकडे जात होता. बजाजनगरमार्गे रांजणगावकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव लोडिंग रिक्षाने (एमएच-२०,सीटी-०८६४) महाराणा प्रताप चौकात अचानक वळण घेत अमोलच्या दुचाकीला समोरुन जोराची धडक दिली. यात अमोल गंभीर जखमी झाला.

त्याला बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान रिक्षाचालक घटनास्थळावरुन पसार झाला. या अपघातात दुचाकीचा समोरुन चुराडा झाला आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत घटनेची नोंद करण्यात आली नव्हती.

Web Title: Two wheelers injured in rickshaw rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.