शहरात दुचाकी चोरट्यांची धूम... आठ दिवसांत २२ दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:20 PM2018-05-28T13:20:32+5:302018-05-28T13:23:38+5:30

गेल्या काही महिन्यांपासून शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात पोलीस व्यस्त असल्याचे पाहून दुचाकी चोरटे सक्रिय झाले.

Two-wheeler lump in eight days | शहरात दुचाकी चोरट्यांची धूम... आठ दिवसांत २२ दुचाकी लंपास

शहरात दुचाकी चोरट्यांची धूम... आठ दिवसांत २२ दुचाकी लंपास

googlenewsNext
ठळक मुद्देशहराच्या वेगवेगळ्या भागातून चोरट्यांनी आठ दिवसांत २२ दुचाकी लंपास केल्याचे समोर आले.

औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांपासून शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात पोलीस व्यस्त असल्याचे पाहून दुचाकी चोरटे सक्रिय झाले. शहराच्या वेगवेगळ्या भागातून चोरट्यांनी आठ दिवसांत २२ दुचाकी लंपास केल्याचे समोर आले.

किरकोळ कारणावरून ११ आणि १२ मे रोजी शहरात दोन समुदायात दंगल झाली. या दंगलीवर नियंत्रण मिळविण्यासोबतच शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शहर पोलीस रात्रं-दिवस काम करीत आहेत. याचाच फायदा घेऊन दुचाकी चोरटे शहरात सक्रिय झाले. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध भागांतून आठ दिवसांत २२ दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. सिडको एन-१ येथील रहिवासी सचिन धर्मापुरीकर यांनी त्यांच्या घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना गुरुवार, दि.२४ मे रोजी रात्री घडली. याप्रकरणी सचिन यांनी एमआयडीसी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली.

दुसरी घटना २५ मे रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहादरम्याान महावीर पंप चौक परिसरातील अलक नंदा कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये उभी केलेली  मोटारसायकल (क्रमांक एमएच-२० सीडब्ल्यू ००६४) चोरट्यांनी पळविली. याविषयी केतन शिवाजी पाटील यांनी क्रांतीचौकठाण्यात तक्रार नोंदविली. सिल्क मिल कॉलनीतून २२ मे रोजी दुपारी अंकुश प्रकाश श्रीखंडे यांची मोटारसायकल (क्रमांक एमएच-२० सीसी ४३३०) तर आकाशवाणी वाहतूक सिग्नलजवळून ओमप्रकाश जांगीड यांची मोटारसायकल (एमएच-२० डीएक्स ७८३४) १० मे रोजी चोरट्यांनी लंपास केली. उस्मानपुरा येथे २२ मे रोजी रात्री अभिजित बनसोडे यांची मोटारसायकल (एमएच-२० बीजी १४३४) चोरट्यांनी चोरून नेली. तर संजयनगर मुकुंदवाडी येथे २३ रोजी चोरट्यांनी रात्री नवनाथ उघडे यांच्या घरासमोरून मोटारसायकल (एमएच-२० ईपी १२२५) पळविली.

मुकुंदवाडीतील लघुवेतन कॉलनीतून केशव वामन नवल यांची मोटारसायकल (एमएच-२१ बीई ९१२२) २४ मे रोजी रात्री चोरट्यांनी पळविली. पुंडलिकनगर येथे घरासमोर उभी केलेली भैरवनाथ नाथजोगी यांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. तर वाळूजमधील मोहटादेवी मंदिराजवळून चोरट्यांनी दिलीप वानखेडे यांची मोटारसायकल २१ मे रोजी लंपास केली. प्रोझोन मॉलसमोर भानुदास उत्तमराव इंगळे यांची उभी केलेली  मोपेड (एमएच- ३१ ईसी ३४२८) चोरट्यांनी चोरून नेली. एपीआय कॉर्नर येथील एका हॉॅटेलजवळ उभी केलेली मोटारसायकल (क्रमांक एमएच-२० डीएल २५६०) चोरट्यांनी पळविली. याप्रकरणी आकाश वाहुळे यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. सातारा परिसरातील राजकुमार देशमुख यांची मोटारसायकल (क्रमांक एमएच-२० सीझेड ३४३८) ६ मे रोजी चोरीला गेली. 
रहिमपूर फाटा येथून गणेश आंधळे यांची मोटारसायकल २३ मे रोजी चोरट्यांनी पळविली. याविषयी आंधळे यांनी वाळूज ठाण्यात तक्रार नोंदविली. काचीवाडा येथील अंकुश दगडूजी ढाकणे यांची मोटारसायकल (क्रमांक एमएच-२० बीके १३३५) २४ मे रोजी चोरट्यांनी क्रांतीचौक परिसरातून चोरून नेली. ढाकणे यांनी क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली.

पानदरिबा येथील कापड दुकानासमोर सुनील संचेती यांनी त्यांची मोपेड (क्रमांक एमएच-२० ईटी २४१२) उभी के ली होती. ही दुचाकी चोरट्यांनी २५ मे रोजी रात्री चोरून नेली. सुनील यांनी सिटीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. नारेगाव येथून चोरट्यांनी आमेर खान बाबर खान यांची तर केम्ब्रिज चौकाजवळून शेख कलीम शेख सुजात यांची मोटारसायकल चोरून नेली. बजाजनगर येथून अरुण यादव यांची दुचाकी चोरून नेली.  शासकीय आयटीआय येथून रवींद्र गोरखनाथ म्हस्के यांची मोटारसायकल १९ मे रोजी चोरीला गेली. तर सिडकोतील सौभाग्य चौकातून आतिश खंबाट यांची मोटारसायकल १२ मे रोजी तर शेख यासर यांची कार ११ मे रोजी सिडको एन-६ येथून चोरट्यांनी पळविली. 

Web Title: Two-wheeler lump in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.