औरंगाबाद जिल्ह्यात कार-ट्रक अपघातात दोन ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:13 AM2018-05-23T00:13:59+5:302018-05-23T00:15:21+5:30

चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार दुभाजकावर आदळून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर धडकली. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रात्री १२.३० वाजता औरंगाबाद-जालना मार्गावरील सटाणा फाट्यावर घडला.

Two killed in a car-truck accident in Aurangabad district, one serious | औरंगाबाद जिल्ह्यात कार-ट्रक अपघातात दोन ठार, एक गंभीर

औरंगाबाद जिल्ह्यात कार-ट्रक अपघातात दोन ठार, एक गंभीर

googlenewsNext
ठळक मुद्देसटाणा फाटा : जालना रोडवर मंगळवारी रात्रीची घटना; उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह अमरावतीकडे रवाना

लोकमत न्यूज नेटवर्क
करमाड : चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार दुभाजकावर आदळून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर धडकली. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रात्री १२.३० वाजता औरंगाबाद-जालना मार्गावरील सटाणा फाट्यावर घडला.
या अपघातात सागर गणेशराव फेरण (३२) व दिलीप दादाजी पराते (४३,रा. प्रवीणनगर, अमरावती) हे दोघे ठार झाले. राहुल गणेशराव फेरण (२९) हे जखमी झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील खाजगी दवाखान्यात उपचार चालू आहे.
अमरावती येथील पराते व फेरण हे रविवारी आयपीएल मॅच पाहण्यासाठी पुण्याला गेले होते. सोमवारी दुपारी ते पुणे येथून कारने (क्र. एम. एच.०४ ई डब्ल्यू ६७९४) अमरावतीकडे परतत असताना मंगळवारी रात्री १२.३० वाजता औरंगाबाद-जालना मार्गावर सटाणा फाट्याजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन आदळली. दुभाजक तोडून ही कार जालनाकडून औरंगाबादकडे जाणाºया ट्रकवर (क्र.एम. पी.२० एच बी ५२४०) धडकली. दोन्ही वाहने भरधाव असल्याने भीषण अपघात होऊन चुराडा झालेली कार ट्रकमध्ये जाऊन अडकली. अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. पी. कोळी, फौजदार प्रदीप भिवसने, जमादार रवींद्र साळवे, रमेश धस, सूर्यकांत पाटील, राहुल मोहतमल,आदिनाथ उकर्डे यांनी घटनास्थळी जाऊन क्रेनच्या मदतीने दोन्ही वाहने वेगळी केली. त्यानंतर कटरने कारचा पत्रा कापून जखमींना बाहेर काढून त्यांना रुग्णवाहिकेतून घाटी दवाखान्यात दाखल केले.
ट्रकचालक मोहंमद इरफान मसुरी (३२,रा. पिपरिया, ता. पाटण, जि. जबलपूर, मध्य प्रदेश) हा स्वत:हून करमाड पोलीस ठाण्यात हजर झाला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले यांनी भेट दिली. अधिक तपास फौजदार प्रदीप भिवसने करीत आहेत.
आदिवासी विभागातील कार्यालयीन व्यवस्थापकाचा मृतांत समावेश
अपघातात ठार झालेले सागर फेरण हे नाशिक येथे आदिवासी विभागात कार्यालयीन व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते, तर दिलीप पराते यांचे अमरावती येथे मेडिकल दुकान आहे.
फेरण व पराते यांच्या पार्थिवाचे औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईक मृतदेह घेऊन
मंगळवारी दुपारी ३ वाजता अमरावतीकडे रवाना झाले.
ट्रकचालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारचालकाविरुद्ध वाहन निष्काळजीपणे चालवून अपघातास करणीभूत ठरल्याचा गुन्हा करमाड पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

Web Title: Two killed in a car-truck accident in Aurangabad district, one serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.