तब्बल अडीच क्विंटल कॅरीबॅग बीडमध्ये जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:41 AM2017-10-27T00:41:06+5:302017-10-27T00:42:10+5:30

बीड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टिकोनातून नगरपालिकेने कंबर कसली आहे. गुरुवारी सकाळपासूनच प्लास्टिक व कॅरीबॅग बंदी संदर्भात कारवाईची मोहीम हाती घेत अवघ्या ३ तासांत तब्बल अडीच क्विंटल कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या.

 Two and a half quintals caribags seized | तब्बल अडीच क्विंटल कॅरीबॅग बीडमध्ये जप्त

तब्बल अडीच क्विंटल कॅरीबॅग बीडमध्ये जप्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टिकोनातून नगरपालिकेने कंबर कसली आहे. गुरुवारी सकाळपासूनच प्लास्टिक व कॅरीबॅग बंदी संदर्भात कारवाईची मोहीम हाती घेत अवघ्या ३ तासांत तब्बल अडीच क्विंटल कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. सुभाष रोड, भाजी मंडई व पेठबीड भागात होलसेल व किरकोळ विक्रेत्यांच्या दुकानावर अचानक मारलेल्या छाप्यांमुळे खळबळ उडाली आहे.
बीड शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग विक्री, तसेच वापरावर बंदीसाठी नगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेत कारवाया करण्यास गुरुवारपासून सुरुवात केली. मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांनी यासाठी ३ पथकांची नियुक्ती केली. हे तिन्ही पथके सकाळपासूनच कामाला लागले. सुभाष रोड, भाजी मंडई व पेठबीड भागातील छोट्या-मोठ्या दुकानांवर छापे टाकून त्यांनी प्लास्टिक कॅरीबॅगची तपासणी केली. जवळपास ९० टक्के दुकानांमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची कॅरीबॅग आढळून आली. या सर्व कॅरीबॅग जप्त नगरपालिकेत आणण्यात आल्या. येथे सीईओंनी पाहणी केली.
ही कारवाई जावळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य, स्वच्छता विभाग प्रमुख व्ही.टी. तिडके, अभियंता श्रद्धा गर्जे, स्वच्छता निरीक्षक आर.एस. जोगदंड, बी.पी. जाधव, सुनील काळकुटे, ज्योती ढाका, अविनाश धांडे, अमोल शिंदे, राम शिंदे, पी.आर. दुधाळ आदी कर्मचाºयांनी केली.

लिहिले एक,
प्रत्यक्षात वेगळेच !
जप्त केलेल्या कॅरीबॅगवर ५० मायक्रॉन थिकनेस असे लिहिलेले होते; परंतु अभियंता श्रद्धा गर्जे यांनी यंत्राद्वारे मोजणी केली असता त्या ३५-४० मायक्रॉन जाडीच्या आढळल्या.
व्ही.टी. तिडके यांनी याबाबत मुख्याधिकाºयांना माहिती देत प्रत्यक्षात मोजणीही करून दाखविली. मुख्याधिकाºयांनी आश्चर्य व्यक्त करीत तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

Web Title:  Two and a half quintals caribags seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.