करमाड येथे भरधाव ट्रक बाजारात शिरला; तिघे गंभीर जखमी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 02:36 PM2018-03-19T14:36:43+5:302018-03-19T14:43:17+5:30

जालना महामार्गावर करमाड येथील पोलीस स्टेशन जवळ सकाळी ११. ३० वाजेच्या सुमारास एक भरधाव ट्रक अनियंत्रित होत रस्त्यावरील बाजारात शिरला.

Truck fleets at Karmad; Three seriously injured | करमाड येथे भरधाव ट्रक बाजारात शिरला; तिघे गंभीर जखमी  

करमाड येथे भरधाव ट्रक बाजारात शिरला; तिघे गंभीर जखमी  

googlenewsNext

औरंगाबाद : जालना महामार्गावर करमाड येथील पोलीस स्टेशन जवळ सकाळी ११. ३० वाजेच्या सुमारास एक भरधाव ट्रक अनियंत्रित होत रस्त्यावरील बाजारात शिरला. या भीषण अपघातात ३० नागरिक जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातात ट्रकने धडकदेत फरफटत नेल्याने एक ट्रक्टर, ८ दुचाकी, बाजारातील काही दुकानांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले.

या बाबत करमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११. ३० वाजेच्या सुमारास एक ५० फुटी लांब ट्रेलर ट्रक (एमएच ४३ -वाय - २२६५ ) अवजड मशीनला घेऊन औरंगाबादहून जालन्याच्या दिशेला जात होता. करमाड येथील पोलीस स्टेशनच्याजवळ हा ट्रक अचानक अनियंत्रीत झाला व त्याने रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या ट्रॅक्टरला धडक दिली. यानंतर ट्रकने ट्रक्टरला जवळपास 50 फूट दूर फरपटत नेले. ट्रक आणि ट्रक्टर पुढे तसाच फरफटत जात रस्त्यावरील बाजारात असलेली एक रसवंती, एक टरबूज विक्रीचे दुकान, शेतकऱ्यांची कापसाची तीन छोटी वाहने, ७ ते ८ दुचाकी यांना धडकला. ट्रक थांबताच नागरिकांनी मोठ्याप्रमाणावर मदत कार्य सुरु केले व जखमींना तत्काळ बाहेर काढले. यात जवळपास ३० नागरिक जखमी झाले असून यातील १० नागरिकांना छोट्या इजा तर इतरांना मोठ्यास्वरुपाची दुखापत आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती अधिक गंभीर आहे त्यांच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय घाटी व खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ट्रकने ट्रक्टरला दूरवर फरफटत नेल्याने मोठा आवाज झाला. या आवाजामुळे रस्त्यामधील नागरिक दूर जाण्यात यशस्वी झाली. 

जखमींची नावे : सतिष आहेर, कुंडलिक आहेर, तुकाराम सरोदे, काकासाहेब जाधव, संदीप व्यवहारे, सचिन खरात, सुनील डांगे, डिगंबर हजारे, मधुकर हजारे, नामदेव रंगभरे, माधव रंगभरे

Web Title: Truck fleets at Karmad; Three seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.