जीव वाचविण्यासाठी चालकाने दरोडेखोरांवर घातला ट्रक; पाचोड येथील घटना  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 03:51 PM2018-03-21T15:51:14+5:302018-03-21T15:57:44+5:30

राष्ट्रीय महामार्ग २११ वर पाचोड जवळील कोळीबोडखा शिवारात आज पहाटे दरोडेखोरांनी तलवारीच्या धाकावर टेम्पो चालकास लुटले. यानंतर एका ट्रकला लुटण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या या दरोडेखोरांवर चालकाने ट्रक घातला.

Truck driver on guard for saving lives; The incident in Panchod | जीव वाचविण्यासाठी चालकाने दरोडेखोरांवर घातला ट्रक; पाचोड येथील घटना  

जीव वाचविण्यासाठी चालकाने दरोडेखोरांवर घातला ट्रक; पाचोड येथील घटना  

googlenewsNext

पाचोड ( औरंगाबाद ) : राष्ट्रीय महामार्ग २११ वर पाचोड जवळील कोळीबोडखा शिवारात आज पहाटे दरोडेखोरांनी तलवारीच्या धाकावर टेम्पो चालकास लुटले. यानंतर एका ट्रकला लुटण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या या दरोडेखोरांवर चालकाने ट्रक घातला. यात एक दरोडेखोर गंभीर जखमी झाला असून त्याच्यासह दरोडेखोरांनी तेथून पलायन केले. या प्रकरणी पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केली असून पाचोड, अंबड व गोंदी पोलीस संयुक्तपणे तपास करत आहेत. 

पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि महेश आंधळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्माईल रुबाब पिंजारी ( ३०, रा.सुरत, गुजरात ) हा आपला छोटा टेम्पो वाहन घेऊन बीडहून सुरतकडे जात होता. पहाटे पाचोड पासून तीन किलोमीटर अंतरावर कोळीबोडखा शिवारात एका जिनिंग जवळ इस्माईलचा टेम्पो दरोडेखोरांनी अडवला. यानंतर त्याला तलवारीचा घाक दाखवत लोखंडी गजाने बेदम मारहाण केली व त्याच्या जवळील रोख रक्कम हिसकावली. यानंतर याच मार्गावरून येणाऱ्या एका ट्रकला अडविण्याच्या प्रयत्न दरोडेखोरांनी केला. मात्र चालकाने ट्रक न थांबवता त्यांच्या अंगावर घालत तो सुसाट वेगात पुढे निघून गेला. मात्र, यात एक दरोडेखोर चिरडला गेला. त्याला इतर दरोडेखोरांनी घटनास्थळावरून उचलून नेले. दरम्यान, जखमी इस्माईल आपला टेम्पो कसाबसा चालवत पाचोडच्या पुढे एका हॉटेलवर आला व त्याने हॉटेल चालकाला घडलेली सर्व हकीकत सांगितली. हॉटेलचालकाने ही माहिती तत्काळ पाचोड पोलीस स्टेशनला कळवली. 

माहिती मिळताच सपोनि महेश आंधळे, पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष खरड, पोलीस जमादार रामदास राख, नरेंद्र अंधारे, भगवान धांडे, नुसरत शेख, प्रमोद फोलाने आदींनी हॉटेलवर भेट दिली. गंभीर जखमी असलेल्या इस्माईलला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी साकेब सौदागर यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविले. यानंतर पाचोड पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करताच सहाय्यक निरीक्षक आंधळे यांनी याची माहिती औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह व जालना पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांना दिली व परिसराची नाकाबंदी केली. श्वानपथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. जखमी झालेला दरोडेखोर व त्याच्या साथीदाराचा शोध पाचोड, अंबड व गोंदी पोलीस संयुक्तपणे करत आहेत. 

Web Title: Truck driver on guard for saving lives; The incident in Panchod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.