पैठण शहरात भरदिवसा तीन घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:42 AM2019-02-04T00:42:37+5:302019-02-04T00:43:01+5:30

उच्चभ्रू वसाहतीत दहशत : कुलूप लावून बाहेर गेलेल्या फ्लॅटला केले लक्ष्य

Three whole house buries in Paithan city | पैठण शहरात भरदिवसा तीन घरफोड्या

पैठण शहरात भरदिवसा तीन घरफोड्या

googlenewsNext

पैठण : पैठण शहरातील शशीविहार व नाथविहार या उच्चभ्रू वसाहतीत शनिवारी भरदुपारी अज्ञात चोरट्यांनी तीन घरांचे कडीकोंडे तोडून घरातील रोख रक्कम व सोन्याचा ऐवज लंपास केला. गजबजलेल्या वसाहतीत भरदुपारी चोरी झाल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाथविहार व शशीविहार या दोन वसाहती नव्याने विकसित करण्यात आल्या आहेत. फ्लॅट सिस्टीमच्या अनेक विंग या भागात असून, मोठ्या संख्येने या ठिकाणी रहिवासी राहतात. दरम्यान, शनिवारी दुपारी चोरट्यांनी यातील कुलूप लावून बाहेर गेलेल्या फ्लॅटला टार्गेट केले. शशीविहार येथील कैलाशकुमार दुर्गादास चौधरी हे फ्लॅटला कुलूप लावून कामासाठी बाहेर गेले होते. त्यांच्या घराच्या कुलपाचा कोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत घरातील ३० हजार ५०० रुपये रोख घेऊन बाजूलाच असलेले हनुमान मापारी यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील एलईडी टीव्ही उचलून नेला. याचप्रमाणे नाथविहार या भागातून पंकज हैबत बेहरे यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील दोन तोळे सोन्याचा ऐवज लंपास केला. रात्री घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे उघड झाल्याने चौधरी, मापारी व बेहरे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक चंदन इमले यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.
दोन महिला, एक पुरुष सीसीटीव्हीत कैद
शशीविहार परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुपारी तीन वाजून वीस मिनिटाला चेहऱ्यावर स्कार्फ गुंडाळून एका मोपेडवर एक पुरुष व दोन महिला या भागात येऊन ३.५० ला बाहेर पडताना दिसत आहे. विशेष म्हणजे महिलांसोबतच्या पुरुषाने आपला चेहरा उघडाच ठेवलेला आहे. या त्रिकुटाने आणखी तीन घरांचे कुलूप तोडले. मात्र, कुणीतरी आल्याने त्यांना काढता पाय घ्यावा लागला. घरी चोरी झाली नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही.

Web Title: Three whole house buries in Paithan city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.