बीडमध्ये तीन हजार नळ कनेक्शन अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:29 AM2017-11-17T00:29:38+5:302017-11-17T00:29:47+5:30

बीड : शहरात फुकटात जागा, साहित्य व पाणी वापरणा-यांची संख्या आधिक आहे. असाच प्रकार बुधवारी पाणीपुरवठा विभागातील समोर आला ...

Three thousand taps connection in Beed invalid | बीडमध्ये तीन हजार नळ कनेक्शन अवैध

बीडमध्ये तीन हजार नळ कनेक्शन अवैध

googlenewsNext
ठळक मुद्देदोन वर्षांपासून न.प.कडून सर्वेक्षणच नाही

बीड : शहरात फुकटात जागा, साहित्य व पाणी वापरणा-यांची संख्या आधिक आहे. असाच
प्रकार बुधवारी पाणीपुरवठा विभागातील समोर आला आहे. दोन वर्षांपूर्वीच्या आकडेवारीनुसार शहरात तीन हजार नळ कनेक्शन अवैध आहेत. त्यानंतर पालिकेने सर्वेक्षणच केले नाही. त्यामुळे बीड पालिकेचे पाणी अनेकजण फुकटात वापरत असल्याचेही दिसून येते.


बीड नगर पालिकेतील राजकारण गाजत असतानाच पालिकेतील गलथान कारभारही चव्हाट्यावर येत आहे. आगोदरच बीड शहराला आठ ते दहा दिवसाला पाणीपुरवठा केला जातो. त्यात हद्दवाढ भागात तर वेळच्यावेळी पाणीच येत नाही. अशातच बीड शहरात एका घरात दोन ते तीन अवैध नळ कनेक्शन घेतले जात आहेत. हे सर्व धनदांडगे आणि राजकीय लोक आहेत. तसेच काही लोक अधिकारी, कर्मचा-यांच्या जवळचे असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. परंतु हा सर्व प्रकार पालिकेसाठी घातक ठरत आहेत.


कारवाईस वसुली विभागाचा आखडता हात
एवढा गंभीर प्रकार असतानाही पालिकेतील पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच ज्या लोकांनी पाणीपट्टी भरली नाही, ज्यांच्याकडे अवैध नळ कनेक्शन आहेत, अशांवर कारवाई करण्यास वसुली विभाग आखडता हात घेत आहे.
हा सर्व प्रकार संशयास्पद असून वसुली व पाणीपुरवठा विभाग संशयाच्या भोवºयात सापडला आहे. त्यामुळे आता कनेक्शनधारकांची तर चौकशी करावीच परंतु अधिकारी, कर्मचा-यांचीही चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी मनविसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव यांनी केली आहे.


पेठबीडमध्ये सर्वाधिक अवैध कनेक्शन
बीड शहरात पेठबीड भागात सर्वाधिक नळ कनेक्शन असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. या लोकांना प्रत्येक वर्षी केवळ नोटिसांचा पाहुणचार केला जातो. प्रत्यक्षात मात्र काहीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

 

Web Title: Three thousand taps connection in Beed invalid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.