‘एमआरआय’साठी तीन महिन्यांची ‘वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:05 AM2019-05-21T00:05:30+5:302019-05-21T00:05:49+5:30

औरंगाबाद : घाटीत ‘एमआरआय’ तपासणीसाठी रुग्णांना तब्बल तीन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. एकीकडे रुग्णांचा भार वाढला आहे, तर ...

Three months' waiting for MRI | ‘एमआरआय’साठी तीन महिन्यांची ‘वेटिंग

‘एमआरआय’साठी तीन महिन्यांची ‘वेटिंग

googlenewsNext
ठळक मुद्देघाटी रुग्णालय : तपासणीसाठी रुग्णांना आॅगस्ट महिन्यातील तारीख

औरंगाबाद : घाटीत ‘एमआरआय’ तपासणीसाठी रुग्णांना तब्बल तीन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. एकीकडे रुग्णांचा भार वाढला आहे, तर दुसरीकडे सध्याचे यंत्र जुनाट झाले आहे. मोजक्या रुग्णांचीच तपासणी त्याद्वारे करता येते. नव्या यंत्राचीही प्रतीक्षाच करावी लागत असल्याने गोरगरीब रुग्णांना यातना सहन कराव्या लागत आहेत.
घाटी रुग्णालयात सध्या दररोज १५ रुग्णांची एमआरआय तपासणी केली जाते. सध्याच्या एमआरआय मशीनचे आयुष्य संपलेले आहे. कोणत्याही क्षणी हे यंत्र बंद पडू शकते. हे यंत्र वारंवार गरम होते. त्यामुळे दिवसभरात थांबत-थांबत रुग्णांची तपासणी केली जात आहे. या सगळ्यांमुळे रुग्णांची प्रतीक्षा यादी दिवसेंदिवस वाढत आहे.
घाटीतील एमआरआय मशीन जुनाट झाल्याने नव्या यंत्रासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. घाटीने गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात एमआरआय मशीनसाठी शिर्डी संस्थानला साकडे घातले होते. त्यानंतर घाटी रुग्णालयाला शिर्डी संस्थान पावले आणि एमआरआय मशीनसाठी १५ कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला. निधी उपलब्ध झाला. मात्र अद्यापही नव्या यंत्राची प्रतीक्षाच करावी लागत आहे. यंत्राची खरेदी प्रक्रिया सुरू असून, लवकरच ते उपलब्ध होईल, असे घाटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
गोरगरिबांना आर्थिक फटका
घाटीत दररोज अवघ्या १५ रुग्णांची तपासणी होते. उर्वरित रुग्णांना तारीख दिली जाते. त्यामुळे नाइलाजाने अनेकांना घाटीबाहेरचा रस्ता धरावा लागत आहे. त्यातून आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ गोरगरीब रुग्णांवर येत आहे. ही परिस्थिती दूर करण्याची मागणी रुग्णांकडून होत आहे.
अत्यावश्यक रुग्णांना तात्काळ
घाटीत आलेल्या अत्यावश्यक रुग्णांची तात्काळ एमआरआय तपासणी केली जाते. तपासणीमुळे उपचारात फरक पडणाऱ्या रुग्णांना प्राधान्यक्रम दिला जातो. इतरांना तारीख दिली जाते. त्यामुळे प्रतीक्षा करावी लागते.
- डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

Web Title: Three months' waiting for MRI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.