‘त्या’ दरोडेखोरांनी औरंगाबादेत घातला होता धुमाकूळ !

By Admin | Published: July 31, 2014 12:14 AM2014-07-31T00:14:26+5:302014-07-31T00:42:18+5:30

बीड : दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा मंगळवारी दरोडा प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या दुचाकीचोरांनी औरंगाबाद जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता, अशी माहिती तपासात पुढे आली.

'Those' dacoits were put in Aurangabad! | ‘त्या’ दरोडेखोरांनी औरंगाबादेत घातला होता धुमाकूळ !

‘त्या’ दरोडेखोरांनी औरंगाबादेत घातला होता धुमाकूळ !

googlenewsNext

बीड : दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा मंगळवारी दरोडा प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या दुचाकीचोरांनी औरंगाबाद जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता, अशी माहिती तपासात पुढे आली.
नारायण उर्फ प्रमोद काकासाहेब पठाडे (रा. साष्टपिंपळगाव ता. अंबड जि. जालना) दादासाहेब रमेश शिंदे (रा. भोजगाव ता. गेवराई) यांचा आरोपींत समावेश आहे. त्यांच्याकडून ३ लाख ५५ हजार किंमतीच्या ११ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. त्यांची कसून चौकशी केल्यावर अनेक बाबींचा उलगडा झाला.
फायनान्सच्या नावाखाली विक्री
चोरुन आणलेल्या दुचाकींची नारायण पठाडे व दादासाहेब शिंदे हे दोघे फायनान्सच्या नावाखाली विक्री करत होते. नव्या कोऱ्या दुचाकी स्वस्तात देऊन त्यांनी धंदाच मांडला होता. स्वस्तातील दुचाकीला भुलून लोकही त्यांच्याक डून दुचाकी खरेदी करायचे.
पाळत ठेवून चोऱ्या
या चोरांनी औरंगाबाद जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. पैठण, बिडकीन, ढोरकीन, कुकाना या भागातून ते दुचाकी पळवून गेवराईत विक्री करत होते. पैठण येथे दहाव्याच्या कार्यक्रमासाठी आलेले लोक नदीत गेल्यावर ते दुचाकी पळवत, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. (प्रतिनिधी)
ओळखीतून जवळीक
आरोपी दादासाहेब शिंदे याची सासरवाडी साष्टपिंपळगाव (ता. अंबड जि. जालना) ही आहे.
शिंदे यांच्या सासऱ्यांच्या घराला चिकटूनच नारायण पठाडे याचे घर आहे. त्या दोघांत ओळख झाली.
त्यानंतर ते एकत्र आले अन् त्यांनी दुचाकी चोरण्यास सुरुवात केली, अशी माहिती दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख भारत राऊत
यांनी दिली.

Web Title: 'Those' dacoits were put in Aurangabad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.