एका डीपीवर आता दोनच कृषिपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:19 AM2018-06-10T00:19:37+5:302018-06-10T00:21:12+5:30

शेतक-यांना कृषिपंपासाठी लवकरच हाय व्होल्टेज वीज जोडणी मिळणार आहे. यासाठी महावितरण कंपनीने उच्चदाब वितरण प्रणाली योजना (एचव्हीडीएस) आणली असून, यापुढे एका डीपीवर (रोहित्र) जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत.

There are now only two agricultural plants on one DP | एका डीपीवर आता दोनच कृषिपंप

एका डीपीवर आता दोनच कृषिपंप

googlenewsNext
ठळक मुद्देशेतऱ्यांना दिलासा : हाय व्होल्टेज वीज जोडणी; वीज चोरीला वाव नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शेतक-यांना कृषिपंपासाठी लवकरच हाय व्होल्टेज वीज जोडणी मिळणार आहे. यासाठी महावितरण कंपनीने उच्चदाब वितरण प्रणाली योजना (एचव्हीडीएस) आणली असून, यापुढे एका डीपीवर (रोहित्र) जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत. सततच्या विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या कटकटीपासून यामुळे शेतक-यांची आता कायमची सुटका होणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कृषिपंपांच्या वीज जोडणीसाठी शेतक-यांनी कोटेशन भरलेले आहे. तरीही मराठवाड्यातील ६७ हजार ३७४, तर मराठवाड्यासह औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत तब्बल ८७ हजार ४८४ शेतकरी अद्यापही वीज जोडणीच्या प्रतीक्षेतच आहेत. या शेतकºयांसह नव्याने मागणी करणाºया ग्राहकाला ‘एसव्हीडीएस’ या योजनेतून जोडणी दिली जाणार आहे. सध्या ६५ व १०० केव्हीए क्षमतेच्या एका रोहित्रावरून २० ते २५ कृषिपंपांसाठी विद्युत पुरवठा केला जातो. आकडे टाकून विजेचा वापर करणारांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे लोड येऊन रोहित्र जळण्याचे प्रमाण मोठे आहे. प्रचलित पद्धतीमुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते, वीज हानी मोठ्या प्रमाणात होते. शिवाय कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होतो. वीजपुरवठ्यात वारंवार बिघाड होतो. यावर ‘एचव्हीडीएस’ योजनेद्वारे या सर्वांवर मात करता येणे शक्य होणार आहे. या नव्या उच्चदाब प्रणालीत उच्चदाब वाहिन्यांवर आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही. नव्या प्रणालीमध्ये एका रोहित्रावरून दोन अथवा जास्तीत जास्त तीनच कृषिपंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे रोहित्रावर ताण येणार नाही. तो जळणार नाही. आकडा टाकून वीज घेता येणार नाही. ही प्रणाली राबविण्यासाठी औरंगाबाद झोन कार्यालयाने सर्व शिवारांमध्ये फिरून सर्वेक्षण पूर्ण केले आहे.
दर वाढल्याने दुसºयांदा अंदाजपत्रक
यासंदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, ‘एचव्हीडीएस’ या नव्या योजनेसाठी महावितरणने औरंगाबाद झोनमध्ये सर्वेक्षण केले आहे. यामध्ये प्रामुख्याने सध्या कार्यरत कृषिपंप किती, किती कृषिपंपांना मीटर आहेत, या योजनेसाठी रोहित्रांची गरज किती, उच्चदाब वाहिन्यांची आवश्यकता किती आदी माहिती संकलित करण्यात आली. यासंदर्भात अंदाजपत्रकही तयार करण्यात आले होते; पण उपकरणे व साहित्याचे दर वाढल्यामुळे पहिले अंदाजपत्रक रद्द करण्यात आले असून, नव्याने अंदाजपत्रक तयार केले जात आहे.

Web Title: There are now only two agricultural plants on one DP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.