नव्या विमानसेवेच्या ‘टेकआॅफ’कडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:40 AM2019-07-09T00:40:52+5:302019-07-09T00:41:16+5:30

स्पाईस जेटकडून औरंगाबादहून सकाळी आणि सायंकाळी मुंबई, दिल्लीसाठी विमानसेवा सुरूकरण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी बंद पडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखती पार पडल्या आहे. नव्या विमानसेवेची तयारी अंतिम टप्प्यात असून, या कंपनीकडून अधिकृत घोषणा आणि वेळापत्रकाकडे विमानतळ प्राधिकरणाचे लक्ष लागले आहे.

Take a look at the new airline's TakeAff | नव्या विमानसेवेच्या ‘टेकआॅफ’कडे लक्ष

नव्या विमानसेवेच्या ‘टेकआॅफ’कडे लक्ष

googlenewsNext
ठळक मुद्देस्पाईस जेटची तयारी अंतिम टप्प्यात : जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखती


औरंगाबाद : स्पाईस जेटकडून औरंगाबादहून सकाळी आणि सायंकाळी मुंबई, दिल्लीसाठी विमानसेवा सुरूकरण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी बंद पडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखती पार पडल्या आहे. नव्या विमानसेवेची तयारी अंतिम टप्प्यात असून, या कंपनीकडून अधिकृत घोषणा आणि वेळापत्रकाकडे विमानतळ प्राधिकरणाचे लक्ष लागले आहे.
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला २७ जून रोजी जेटच्या अधिकाºयांनी भेट देऊन सोयीसुविधा आणि प्रवासी क्षमतेचा आढावा घेतला. या कंपनीने जेट एअरवेजच्या माजी कर्मचाºयांच्या मुलाखतीही घेतल्या. त्यामुळे जेट एअरवेजचे कर्मचारी स्पाईस जेटची धुरा सांभाळणार असे दिसते. यामुळे लवकरच स्पाईस जेटकडून औरंगाबादहून विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळाले. शिवाय या कंपनीकडून आॅगस्टमध्ये विमानसेवा सुरूहोणार असल्याचे खा. इम्तियाज जलील यांनी एका कार्यक्रमात सांगितले.
स्पाईस जेटकडून दिल्ली, मुंबईसाठी विमानसेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत. तीन महिन्यांपूर्वी जेट एअरवेजचे सकाळ आणि सायंकाळचे विमान बंद झाल्याने औरंगाबादच्या हवाई कनेक्टिव्हिटीला मोठा फटका बसला. त्याचा विविध क्षेत्रांवर मोठा परिणाम जाणवत आहे. औरंगाबाद शहर सध्या एअर इंडिया आणि ट्रू जेट कंपनीमुळे मुंबई, दिल्ली आणि हैदराबादला हवाई सेवेने जोडलेले आहे.
गेल्या महिनाभरात औरंगाबादहून नवीन विमानसेवा सुरूहोण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. एकाच वेळी अनेकांकडून पाठपुरावा करण्यात आला. या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे दिसते; परंतु यासंदर्भात चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाला अद्यापही कंपनीकडून अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही.
एकत्रित प्रयत्नाने यश
विमानसेवा सुरूकरण्यासाठी गेल्या काही दिवसांत एकत्रित प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे स्पाईस जेट विमान कंपनीची विमानसेवा सुरूहोत असल्याचे दिसते, असे औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत म्हणाले.

Web Title: Take a look at the new airline's TakeAff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.