सुशी तिहेरी हत्याकांडातील फरार आरोपीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:34 AM2017-11-17T00:34:24+5:302017-11-17T00:34:28+5:30

गेवराई : तालुक्यातील सुशी येथील तिहेरी हत्याकांडातील फरार आरोपीने आत्महत्या केली. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास मादळमोही शिवारातील ...

Suicide in the triple murder case | सुशी तिहेरी हत्याकांडातील फरार आरोपीची आत्महत्या

सुशी तिहेरी हत्याकांडातील फरार आरोपीची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देमारेकरी भावाचा मृतदेह आढळला मादळमोहीत

गेवराई : तालुक्यातील सुशी येथील तिहेरी हत्याकांडातील फरार आरोपीने आत्महत्या केली. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास मादळमोही शिवारातील एका ओढ्यात कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे फरार असलेल्या या आरोपीने आपला सख्खा भाऊ, भावजय आणि पुतण्यास विहिरीत ढकलून देऊन त्यांनी आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता.


तालुक्यातील सुशी येथे तुळशीराम पवार त्याच्या कुटुंबियासमवेत राहत होता. शेतात कापूस वेचणीसाठी २८ आॅक्टोबर रोजी तुळशीराम, पत्नी जयश्री व मुलगा सुरेश तिघे गेले होते. मात्र, शोधाशोध केल्यानंतर जयश्रीचा मृतदेह आढळून आला होता. मात्र, तुळशीराम व सुरेशचा शोध लागत नव्हता. दुस-या दिवशी शोधाशोध केल्यानंतर तुळशीराम आणि सुरेश यांचे मृतदेह आढळले. नेमका काय प्रकार आहे हे कोणाच्याही लक्षात येत नव्हते.


दरम्यान, मयत तुळशीरामचा भाऊ राजेंद्र लक्ष्मण पवार याने पोलिसात फिर्याद दिली होती. यानंतर राजेंद्रने ऊसतोड मजुराच्या मुकादमाच्या घरापर्यंत धाव घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, नंतर पोलीस तपासात राजेंद्र हाच मारेकरी असल्याची बाब पुढे आली. आणि राजेंद्र मागील १० दिवसांपासून फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. मयत जयश्रीचा भाऊ अशोक याने गेवराई पोलीस ठाण्यात फिर्यादही दिली होती. शेतीच्या वाटणीवरुन तुळशीराम, जयश्री आणि सुरेश यांचा खून केल्याचा राजेंद्रवर आरोप होता.


दरम्यान, गुरुवारी (दि. १६) मादळमोही परिसरातील एका ओढ्यात घाणेरडा वास येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर लोक जमा झाले. मृतदेह तरंगत असल्याचे पाहून खळबळ उडाली. ही बाब पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृतदेहाची मोबाईल, सीमकार्ड व कपड्यांवरुन ओळख पटविण्यात आली. पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह गेवराई येथे नेला.


शवविच्छेदन अहवालानंतर उलगडणार गूढ
गेवराई ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे व सहकाºयांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. मृतदेह सडलेला होता. आठ ते दहा दिवसांपूर्वीचा तो असावा असा अंदाज वर्तविण्यात येत होता. पोलिसांनी तुळशीराम व राजेंद्र याचे वडील लक्ष्मण पवार यांचा जवाब नोंदवला. ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालानांतर या प्रकरणातील गूढ उकलणार आहे.

Web Title: Suicide in the triple murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.