Sudhanshu Nikmalaya runner-up | सुधांशू निकमला उपविजेतेपद

औरंगाबाद : आॅल मराठी चेस असोएशनतर्फे पुणे फेस्टिव्हलअंतर्गत अ.भा. १६०० रेटिंग खालील खेळाडूंच्या बुद्धिबळ स्पर्धेत सुधांशू निकम याने उपविजेतेपद पटकावले. पुणे येथे झालेल्या स्पर्धेत देशभरातील ५०४ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. सुधांशू निकम याने ९ डावांपैकी ७ डावांत विजय मिळवला आणि दोन डावांत बरोबरी साधली. त्याने श्रावणी पाटील, द्रोण बन्सल, मुन्ना बैरागी, रोहन ढोरे, प्रवीण माने, वैभव बोरसे, जतीन देशपांडे यांच्यावर विजय मिळवला, तर प्रथमेश दलाल, रणजित कलायरसन यांच्यासोबत बरोबरी साधली. या कामगिरीमुळे सुधांशूच्या इंटरनॅशनल रेटिंगमध्ये ७४ गुणांची वाढ होऊन त्याचे रेटिंग १,५७५ झाले आहे. या यशाबद्दल पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य अभिजित दिवे, राहुल तांदळे, आॅल मराठी चेस असोसिएशनचे कार्याध्यक्ष विजय देशपांडे, औरंगाबाद जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल सावे, सचिव हेमेंद्र पटेल, अमरीश जोशी, सुभाष सोहनी, विशाल नराटे, शिरीक्ष बक्षी, विलास राजपूत आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.


Web Title:  Sudhanshu Nikmalaya runner-up
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.