केंद्र संचालकासह शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 11:31 PM2019-07-06T23:31:43+5:302019-07-06T23:32:12+5:30

सरस्वती भुवन शिक्षणसंस्थेच्या सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील स.भु. हायस्कूलमध्ये दहावीच्या गणित विषयात झालेल्या सामूहिक कॉपी प्रकरणात सहभागी केंद्र संचालकासह तीन शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जारी केले आहेत. दोषी विद्यार्थ्यांवर चालू वर्षाची संपादणूक रद्द करीत आगामी तीन वर्षांसाठी परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली. या कारवाईची अंमलबजावणी करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह स.भु. संस्थेला पत्र दिल्याची माहिती मंडाळाच्या सचिव सुगाता पुन्ने यांनी दिली.

Submit criminal cases to teachers, including the center operator | केंद्र संचालकासह शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

केंद्र संचालकासह शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

googlenewsNext
ठळक मुद्देगोंदेगाव सामूहिक कॉपी प्रकरण : शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश; शिक्षकांवर कारवाईसाठी स.भु. संस्थेला पत्र


औरंगाबाद : सरस्वती भुवन शिक्षणसंस्थेच्या सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील स.भु. हायस्कूलमध्ये दहावीच्या गणित विषयात झालेल्या सामूहिक कॉपी प्रकरणात सहभागी केंद्र संचालकासह तीन शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जारी केले आहेत. दोषी विद्यार्थ्यांवर चालू वर्षाची संपादणूक रद्द करीत आगामी तीन वर्षांसाठी परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली. या कारवाईची अंमलबजावणी करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह स.भु. संस्थेला पत्र दिल्याची माहिती मंडाळाच्या सचिव सुगाता पुन्ने यांनी दिली.
दहावीच्या परीक्षेतील गोदेंगाव येथील स. भु. हायस्कूलमधील परीक्षा केंद्रात ३२२ विद्यार्थी ११ मार्च रोजी गणित विषयाची परीक्षा देत होते. या परीक्षेत केंद्र संचालक बी. एन. कोठावदे, गणित विषयाचे शिक्षक प्रदीप महालपुरे व संदीप महालपुरे यांनी संगनमत करून बीजगणिताच्या परीक्षेत कर्तव्यात कसूर करीत गैरव्यवहार केला. यामुळे या शिक्षकांवर महाराष्ट्र प्रिव्हेन्शन आॅफ माल प्रॅक्टिसेस अ‍ॅक्ट युनिव्हर्सिटी बोर्ड अ‍ॅण्ड आॅदर स्पेसिसाइट्स एक्झामिनेशन अ‍ॅक्ट १९८२ मधील कलम ७ नुसार फौजदारी गुन्हे दाखल करीत तात्काळ कारवाईचा अहवाल मंडळाला कळविण्यात यावा, असे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना दिले आहेत. याशिवाय ३२२ विद्यार्थ्यांवर चालू वर्षाचा निकाल रद्द करीत (वन प्लस टू ) आगामी तीन वर्षांत परीक्षा देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सरस्वती भुवन शिक्षणसंस्थेच्या व्यवस्थापनाला पत्र पाठवत इतर सहभागी व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे पत्रही शनिवारी पाठविण्यात आले आहे. मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच सामूहिक कॉपीप्रकरणी कडक कारवाई करण्यात आली आहे.

काय होती घटना?
गोंदेगाव येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांच्या भरारी पथकाने ११ मार्च रोजी भेट दिली. तेव्हा या केंद्रावर शिक्षकांच्या सहकार्यानेच सामूहिक कॉपी करण्यात येत असल्याचे आढळून आले. कार्बनच्या मदतीने एकाच हस्ताक्षरातील कॉपी समोर आली. यात शंभरपेक्षा जास्त झेरॉक्स प्रती जप्त केल्या. या घटनेचा अहवाल मंडळाला दिल्यानंतर केंद्र संचालक बदलण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका मंडळात मागविल्या. तसेच चौकशीसाठी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीने दिलेल्या अहवालानंतर विभागीय शिक्षण मंडळाच्या तदर्थ समितीसमोर हे प्रकरण ठेवण्यात आले होते. यात विविध मुद्यांवर चर्चा झाल्यानंतर १४ ते १६ जूनदरम्यान परीक्षार्थींनाही बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. यानंतर शनिवारी कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.

Web Title: Submit criminal cases to teachers, including the center operator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.