धावत्या रेल्वेसमोर उभे राहून विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 01:09 PM2019-05-16T13:09:14+5:302019-05-16T13:16:09+5:30

तो अर्धातास रेल्वेची वाट पाहत मोबाईलशी खेळत होता

Student's suicide by standing in front of the running train in Aurangabad | धावत्या रेल्वेसमोर उभे राहून विद्यार्थ्याची आत्महत्या

धावत्या रेल्वेसमोर उभे राहून विद्यार्थ्याची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देसुरज संग्रामनगर रेल्वे रूळ येथे रेल्वेची प्रतीक्षा होता प्रत्यक्षदर्शिना संशय आल्याने त्यांनी त्याला आवाज दिले

औरंगाबाद : मनमाडहून नांदेडला निघालेल्या पॅसेंजर रेल्वेसमोर उभे राहून एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास संग्रामनगर परिसरात घडली. सुरज गंगाधर भडारे (१९, रा. उमरी.ह .मु.प्लाट नं ११ गट नं १०५, सातारा परिसर )असे मयताचे नाव आहे . त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी सुरज संग्रामनगर रेल्वे रूळ (पोल क्र११६ /२) येथे अर्धा तासापासुन रेल्वे येण्याची प्रतिक्षा करत होता. या ठिकाणी एक ओटा आहे .ओटयावर बसून सुरज सुमारे तीस मिनिटे मोबाइलशी खेळत होता. सोपान पंडित हे शेजारील ग्राऊंडवर फिरुन याच ओट्यावर येऊन बसत असतात. आज फिरून आल्यावर अनोळखी तरुण ओटयावर बसलेला पाहून पंडीत दापंत्य ओट्यावर गेले नाही. सुरजच्या हालचालीवरुन त्यांना संशय आला आणि सुरज सतत रेल्वे येणेचे बघत होता. त्याच वेळी त्यांनी सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गोर्डे पाटील यांना   फोनवरून याबाबत कळविले. तूम्ही लवकर या असे ते म्हणाले. 

त्याच वेळेस मनमाड पॅसेंजर भोंगा वाजवित तेथून जाऊ लागली त्याच क्षणी सुरज अचानक रेल्वे समोर उभा राहिला. पंडीत दांपत्य आणि गोर्डे पाटील जोरात ओरडले मात्र तोपर्यंत भरधाव रेल्वे सुरजच्या अंगावरुन गेली. या घटनेनंतर रेल्वेचालकाने काही मिनिटे गाडी थांबविली. रेल्वेचे अधिकारी व जवाहरनगर प्रभारी सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांनी आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून मोबाईल व्हॅन मधून सुरजचा मृतदेह  घाटीत दाखल केला.

Web Title: Student's suicide by standing in front of the running train in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.