परीक्षेने आणले रडकुंडीला

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 12:42am

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या पहिल्या दिवशी परीक्षार्थींना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या पहिल्या दिवशी परीक्षार्थींना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. हॉल तिकिटांवरील परीक्षा केंद्र ऐनवेळी बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना कोठे जावे? नवीन परीक्षा केंद्र कोठे आहे? विद्यापीठाने दिलेल्या परीक्षा केंद्राचे नाव पहिल्यांदाच ते ऐकत असल्यामुळे विद्यार्थ्यांना धक्का बसत होता. परीक्षेला तर सुरुवात झाली असून, वेळेत कसे पोहोचायचे? केंद्रावर जाण्यासाठी आॅटोरिक्षा मिळेल का? अशा असंख्य नानाविध प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांना अश्रू आवरता आले नाहीत. अनेक ठिकाणी अपंग, अंध विद्यार्थ्यांनाही ढिसाळ नियोजनाचा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. विद्यापीठ पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना तब्बल ३ लाख ५ हजार ४९४ विद्यार्थी बसले आहेत. या सर्वांची परीक्षा शुक्रवारी सुरू झाली. या परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना अभ्यासापेक्षा मोठ्या अग्निदिव्यातून जावे लागले.

 

संबंधित

होय, नापासांच्या पदव्यांची छपाई झाली, कुलगुरूंची पत्रकार परिषदेत कबुली
एटीएममधील सायरन वेळीच वाजल्याने चोरट्यांनी ठोकली धूम 
लग्नास नकार दिल्याने प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल 
औरंगाबादेत अश्लील लिंक पाठविणाऱ्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हा
मैत्रिणीवर अत्याचार करून काढले अश्लील फोटो; बेगमपुरा पोलिसांकडून आरोपीस अटक 

औरंगाबाद कडून आणखी

तिकिटांच्या रांगेतच जातो अजिंठाच्या पर्यटकांचा वेळ
औरंगाबादची कचराकोंडी फुटणार?
नापास विद्यार्थ्यांना पदवी वाटपाने शिक्षण क्षेत्रात खळबळ
अजिंठा लेणीच्या पर्यटकांवर तिकिटांचा मारा
अमेरिकेतील प्रदर्शनात झळकणार औरंगाबादच्या चित्रकाराची चित्रे

आणखी वाचा