परंडा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तूर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी मुगाव ते शिरगीरवाडी मार्गावर तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.
मुगांव ते शिरगिरवाडी रस्ता करण्यात यावा, परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तूर हमीभाव केंद्र तत्काळ चालू करण्यात यावे, कृषीसेवक व कृषी मंडळ अधिकारी कुठल्याही गावामध्ये हजर राहत नाहीत, त्यांची चौकशी करुन तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. परंडा तालुक्यातील कृषी विभागात पाणलोट कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी, शेतीपंपाला बारा तास सुरळीत वीजपुरवठा करावा आदी मागण्यांसाठी मुगाव- शिरगिरवाडी रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आले.
आंदोलनामध्ये तालुकाध्यक्ष विलास खोसरे, पक्षाध्यक्ष शिवानंद तळेकर, युवाध्यक्ष तुकाराम हजारे, भूम तालुकाध्यक्ष तानाजी पाटील, युवाध्यक्ष भाऊसाहेब मुंडे, बंडु शेळके, राहुल तांबारे, परंडा तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय तिंबोळे, शंकर घोगरे, शिवाजी ठवरे, नागेश गर्जे, बाबासाहेब वाघ, श्रीमंत शेळके, देवा दुबळे, बाळु कारंडे, संतराम ठवरे यांच्यासह मुगांव व शिरगिरवाडी येथील शेतकरी उपस्थित होते.(वार्ताहर)