वाळूज एमआयडीसीत जडवाहनांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 10:10 PM2019-06-24T22:10:41+5:302019-06-24T22:11:02+5:30

वाळूज एमआयडीसीतील एल सेक्टरमध्ये रस्त्याच्या दुतर्फा जडवाहने उभी राहत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

 Stools in Siliguri MIDC | वाळूज एमआयडीसीत जडवाहनांचा ठिय्या

वाळूज एमआयडीसीत जडवाहनांचा ठिय्या

googlenewsNext

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील एल सेक्टरमध्ये रस्त्याच्या दुतर्फा जडवाहने उभी राहत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या जडवाहनांमुळे इतर वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी अपघाताचा धोकाही वाढला आहे.


वाळूज उद्योगनगरीत दररोज मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. औद्योगिक क्षेत्रातील एल सेक्टरमध्ये एका बिअरच्या कंपनीत मालाची ने-आण करणारी जडवाहने रस्त्याच्याकडेला उभी केली जात आहे. या परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा ही जडवाहने थांबत असल्यामुळे सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्त्यावरच ही वाहने उभी राहत असल्यामुळे लहान-मोठे अपघात घडत आहेत.

विशेष म्हणजे दोन-दोन दिवस ही जडवाहने एकाच जागी उभी राहत असल्यामुळे या परिसरात सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करणाºया वाहनधारकांकडे एमआयडीसी प्रशासन व वाहतूक शाखेचे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. कामगार चौकात एमआयडीसीच्या वतीने बीओटी तत्त्वावर वाहनतळ सुरु करण्यात आले आहे.

मात्र या वाहनतळात मूलभूत सुविधाचा अभाव असल्यामुळे वाहनधारक औद्योगिक परिसरात मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करतात. वाळूज उद्योगनगरीत फोस्टर कंपनीजवळ एमआयडीसी प्रशासनाच्यावतीने मध्यंतरी नवीन वाहनतळ उभारण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र, नवीन वाहनतळाचा प्रस्ताव लालफितीत अडकल्यामुळे ठिकठिकाणी जडवाहने रस्त्यावरच थांबत असल्याचे चित्र उद्योगनगरीत पहावयास मिळत आहे.


उद्योजकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
वाळूज एमआयडीसीतील एल सेक्टर मध्ये असलेल्या युनायटेट ब्रेव्हरेज या कंपनीची जडवाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी जात असल्याचा आरोप या भागातील उद्योजक राजेश मानधनी, रवींद्र कोंडेकर, मनिष धूत आदींनी केला आहे. या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेऊन उद्योजकांना आपल्या समस्या मांडत वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी सुरक्षारक्षक नेमण्याची सूचनाही केली होती. मात्र कंपनी व्यवस्थापनाकडून याकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अप्रिय घटना घडण्याची भितीही या उद्योजकांनी वर्तविली आहे.

Web Title:  Stools in Siliguri MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.