सेंट लॉरेन्स, नाथ व्हॅली सेमीफायनलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:52 AM2018-03-20T00:52:33+5:302018-03-20T10:55:33+5:30

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ मैदानावर सुरू असलेल्या लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट लॉरेन्स, नाथ व्हॅलीने सेमीफायनलमध्ये धडक मारली, तर द जैन इंटरनॅशनल आणि केम्ब्रिज संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. आज झालेल्या सामन्यात विशाल धुमाळ, शहद ओपलकर, अमेय गवई आणि संकेत पाटील सामनावीर ठरले.

St. Lawrence, Nath Valley in the semi-finals | सेंट लॉरेन्स, नाथ व्हॅली सेमीफायनलमध्ये

सेंट लॉरेन्स, नाथ व्हॅली सेमीफायनलमध्ये

googlenewsNext
ठळक मुद्देआंतरशालेय क्रिकेट स्पर्धा : द जैन इंटरनॅशनल, केम्ब्रिज उपांत्यपूर्व फेरीत

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ मैदानावर सुरू असलेल्या लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट लॉरेन्स, नाथ व्हॅलीने सेमीफायनलमध्ये धडक मारली, तर द जैन इंटरनॅशनल आणि केम्ब्रिज संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. आज झालेल्या सामन्यात विशाल धुमाळ, शहद ओपलकर, अमेय गवई आणि संकेत पाटील सामनावीर ठरले.

आज झालेल्या पहिल्या सामन्यात सेंट लॉरेन्सने राजे शिवाजी संघावर ४ गडी राखून मात केली. राजे शिवाजी संघाने प्रथम फलंदाजी करीत ९ बाद ६२ धावा केल्या. त्यांच्याकडून सागर हिवाळेने १६ व बजरंग जाधवने १४ धावा केल्या. सेंट लॉरेन्सकडून विशाल धुमाळने ८ धावांत ४ गडी बाद केले. शुभम तुपे व श्रेयस बनसोडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात सेंट लॉरेन्सने विजयी लक्ष्य ९.३ षटकांत ४ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून विशाल धुमाळने ४ चौकारांसह २१ धावा केल्या.

दुसऱ्या समान्यात द जैन इंटरनॅशनलने होलीक्रॉस संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाºया होलीक्रॉसने १0 षटकांत ८ बाद ४६ धावा केल्या. त्यांच्याकडून ऋतुराज सावळेने २१ धावा केल्या. द जैन इंटरनॅशनलकडून अमेय गवईने ९ धावांत ४ गडी बाद केले. अनुराग शर्माने ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात जैन इंटरनॅशनलने विजयी लक्ष्य ५.१ षटकांत २ बाद ४७ धावा करीत गाठले. त्यात सर्वाधिक २२ अवांतर धावांचा समावेश आहे. अमेय गवईने नाबाद १३ धावा केल्या. होलीक्रॉसकडून ऋतुराज सावळेने २ गडी बाद केले.

तिस-या सामन्यात नाथ व्हॅलीने रायन इंरटनॅशनलचा १0 गडी राखून पराभव केला. रायन इंटरनॅशनलने प्रथम फलंदाजी करताना १0 षटकांत ७ बाद ५८ धावा केल्या. त्यांच्याकडून यश गाढवे याने २ चौकारांसह १५ धावा केल्या. नाथ व्हॅलीकडून देवांग मिश्राने ८ धावांत ३ गडी बाद केले. शहद ओपलकर व दिव्यम मिश्रा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात नाथ व्हॅलीने विजयी लक्ष्य ५.४ षटकांत बिनबाद ५९ धावा करीत गाठले. त्यांच्याकडून शहद ओपलकरने ४ चौकार, एका षटकारासह ३0 व दिव्यम मिश्राने ३ चौकारांसह २३ धावा केल्या. चौथ्या सामन्यात केम्ब्रिजने बळीराम पाटील संघावर २६ धावंनी मात केली. केम्ब्रिजने प्रथम फलंदाजी करीत १0 षटकांत २ बाद १0९ धावा केल्या. त्यांच्याकडून संकेत पाटीलने ४२ चेंडूंत एक षटकार व ८ चौकारांसह ६१ आणि ओंकार चलक याने २ षटकार व एका चौकारांसह १0 चेंडूंत नाबाद २१ धावा केल्या. बळीराम पाटील संघाकडून ऋतुराज विधातेने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात बळीराम पाटील संघाने ९ बाद ८३ धावा केल्या. त्यांच्याकडून रोहित मघाडेने ३१ चेंडूंत ५ चौकारांसह ३६ व आकाश शिंदेने १६ धावा केल्या. केम्ब्रिजकडून सिमर राजपालने १९ धावांत ३ गडी बाद केले. रौनक डोडियाने २, तर ऋषी तोतलाने १ गडी बाद केला.

आजचे सामने
सकाळी ८ वाजता : स. भु. हायस्कूल, औरंगाबाद वि. द जैन इंटरनॅशनल स्कूल
१0 वाजता : केम्ब्रिज स्कूल वि. द जैन इंटरनॅशनल
दुपारी १२ वा. : सेंट लॉरेन्स वि. नाथ व्हॅली (उपांत्य फेरी)

Web Title: St. Lawrence, Nath Valley in the semi-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.