रंगमंचावर ‘एसटी’ कर्मचा-यांचा ‘नाट्यसुगंध’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:49 PM2017-12-10T23:49:18+5:302017-12-10T23:49:25+5:30

एसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतील कर्मचारी दैनंदिन बसबांधणीचे काम सांभाळून स्वत:मधील कलावंत जोपासत आहेत. कर्मचा-यांमध्ये दडलेला हा कलावंत नाट्य स्पर्धांच्या माध्यमातून समोर येत आहे. ‘नाट्यसुगंध’ असे नाव असलेला एसटी कर्मचाºयांचा संघ रंगमंचावर कलाविष्कार सादर करून वेगळा ठसा उमटवीत आहे.

 'ST' employee's 'NatyaSugandh' on stage | रंगमंचावर ‘एसटी’ कर्मचा-यांचा ‘नाट्यसुगंध’

रंगमंचावर ‘एसटी’ कर्मचा-यांचा ‘नाट्यसुगंध’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतील कर्मचारी दैनंदिन बसबांधणीचे काम सांभाळून स्वत:मधील कलावंत जोपासत आहेत. कर्मचा-यांमध्ये दडलेला हा कलावंत नाट्य स्पर्धांच्या माध्यमातून समोर येत आहे. ‘नाट्यसुगंध’ असे नाव असलेला एसटी कर्मचाºयांचा संघ रंगमंचावर कलाविष्कार सादर करून वेगळा ठसा उमटवीत आहे.
मध्यवर्ती कार्यशाळेतील कर्मचारी रमाकांत चाफेकानडे, राजू घाटे, लालू वाघमारे, मल्हारी वाघमारे, कुंदन मलभागे, गजानन मुळे, नारायण राचलवार, प्रवीण कांबळे, महेश वैद्य आणि डॉ. अलका कर्णिक हे सर्व जण नाट्य स्पर्धेत सहभागी होऊन एसटी महामंडळाच्या नावलौकिकात भर टाकत आहेत. नाटकामध्ये केवळ सहभागी न होता स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी प्रत्येक जण परिश्रम घेतो. नाटकामध्ये ठसा उमटविण्यासाठी सरावाला तेवढेच महत्त्व आहे. बसबांधणीचे काम सांभाळून मिळणाºया वेळेमध्ये सर्व कर्मचारी नाटकाची तालीम करतात.
गतवर्षी आंतरविभागीय नाट्य स्पर्धेत या कलावंत कर्मचाºयांनी ‘जमलं बुवा एकदाचं’ हे नाटक सादर केले होते. यामध्ये सर्वोत्कृष्ट कलावंत म्हणून कुंदन मलभागे यांनी पारितोषिक पटविले. इतर नाट्य स्पर्धांमध्येही कर्मचाºयांनी सहभागी होऊन एक वेगळी ओळख निर्माण केली. पुढील आठवड्यात नगर येथे राज्यस्तरीय स्पर्धा होत आहे. यामध्ये हे कलावंत ‘विक्रमादित्य’ हे नाटक सादर करणार आहेत. त्यासाठी मागील महिनाभरापासून कर्मचारी सराव करीत आहेत. कार्यशाळा व्यवस्थापक उद्धव काटे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाºयांची ही वाटचाल सुरू आहे. युवा कर्मचाºयांबरोबर ज्येष्ठ कर्मचारीही ‘नाट्यसुगंध’मध्ये तेवढ्याच उत्साहाने सहभागी झालेले आहेत. त्यामुळे नाटक अधिक चांगले होण्यासाठी त्यांचेही मार्गदर्शन मिळते.
कर्मचाºयांचे आॅडिशन
नाटकामध्ये केवळ सहभाग नोंदवून, नाटक सादर करूनच थांबायचे नसते, तर त्यापुढे वाटचाल करायची असते. त्यामुळे मनापासून आवड असलेला खरा कलावंत नाटकात सहभागी झाला पाहिजे. त्यामुळे नाटकात आवश्यक असलेल्या पात्रांसाठी कर्मचाºयांचे आॅडिशन घेऊन निवड झाली.
जीवनात ऊर्जा
एकंदरीत कामगारांच्या जीवनात किती संघर्ष असतो, हे सगळ्यांना माहीत आहे. नाटकांमध्ये सहभागी होऊन जीवनामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. स्पर्धेत विजयी होऊन कार्यशाळेचे नाव उंचविण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे गजानन मुळे, कुंदन मलभागे, प्रवीण कांबळे यांनी सांगितले.

Web Title:  'ST' employee's 'NatyaSugandh' on stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.