सोयाबीनला शेंगाच नाहीत शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 11:24 PM2017-08-17T23:24:05+5:302017-08-17T23:24:05+5:30

या वर्षी समाधानकारक पाऊसच झाला नसल्याने, परिसरातील २२ दिवसाच्या उघडीमुळे खरीपाचे पिक पुर्णत: करपून गेले आहे. त्यातच अर्धवट करपलेली पीके तरली असताना वातावरणातील बदलामुळे मात्र पिकावर रोगराई पसरल्याने सोयाबीन पिकाला शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

Soyabean farmers do not have shawls again farmers worry | सोयाबीनला शेंगाच नाहीत शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त

सोयाबीनला शेंगाच नाहीत शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : या वर्षी समाधानकारक पाऊसच झाला नसल्याने, परिसरातील २२ दिवसाच्या उघडीमुळे खरीपाचे पिक पुर्णत: करपून गेले आहे. त्यातच अर्धवट करपलेली पीके तरली असताना वातावरणातील बदलामुळे मात्र पिकावर रोगराई पसरल्याने सोयाबीन पिकाला शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
गोरेगाव परिसरात २५ जुलै पासून २० ते २२ दिवस पावसाने दडी मारल्याने खरीपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ व दमट वातावरणामुळे रोगराईचा प्रदुर्भाव होत आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी निसर्गाच्या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. उडिद, मूग पीकावर कोवळ्या शेंगा धरण्याच्या स्थितीत करपा, मावा आदी रोगाच्या प्रार्दुभावामुळे पिके पीवळी पडून पुर्णत: करपून गेली होती. तसेच सोयाबीन पिकावरही चक्री भुंगा आणि विविध प्रकारच्या आळ्यामुळेही सोयाबीन धोक्यात सापडले. शेतकरी खर्चाची पर्वा न करता शेतकरी पिके वाचविण्यासाठी महागाडी कीटक नाशकाच्या फवारण्या करीत आहेत. परिसरातील ब्राम्हणवाडा, चोंढी खु, बु, बाभूळगाव आदी भागात भयंकर परिस्थिती आहे.

Web Title: Soyabean farmers do not have shawls again farmers worry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.