जिल्ह्यात सहाच डॉक्टर बोगस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:41 AM2017-10-06T00:41:41+5:302017-10-06T00:41:41+5:30

बोगस वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घाळण्यासाठी जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी घेतली. यात सहा डॉक्टरांना बोगस घोषित केले.

Six doctors in the district bogas! | जिल्ह्यात सहाच डॉक्टर बोगस !

जिल्ह्यात सहाच डॉक्टर बोगस !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : बोगस वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घाळण्यासाठी जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी घेतली. यात सहा डॉक्टरांना बोगस घोषित केले.
यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आकाश कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, जिल्हा ग्राहक तक्रार मंचाचे प्रतिनिधी बी.सी. सोळुंके व पोलीस निरीक्षक कसबे आदी उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये बोगस डॉक्टरांची नावे सांगण्यात आली. यात वसमत येथील व्यवसायिक पी.आर. बिस्वास, मंडल, तुषार विश्वास, सेनगाव येथील शेंडगे, गायकवाड, औंढा येथील विश्वानाथ चन्ने यांच्याकडे कोणतीही डिग्री किंवा डिप्लोमा नाही. तसेच नोंदणी प्रमाणपत्र नाही. त्यांना बोगस वैद्यकिय व्यवसायिक असे घोषित केले आहे. बोगस डॉक्टर आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले. सदरील बैठकीत महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य यांचे शासन परिपत्रकानुसार वैद्यकीय व्यवसायिकांना संबंधीत वैद्यकिय परिषदेकडे नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा यामध्ये दंडात्मक तरतूद आहे. तसेच नोंदणीशिवाय राज्यात वैद्यकीय व्यवसाय करण्यास मज्जाव केल्याने अशाप्रकारची नोंदणी न केल्यास ही कारवाई केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
जिल्ह्यात अजूनही कडक तपासणीची गरज आहे. मोहिमेचा गाजावाजा होत असल्याने अनेकजण तत्काळ गाशा गुंडाळत आहेत.

Web Title: Six doctors in the district bogas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.