औरंगाबादच्या श्वेता जाधवने दक्षिण विभागाविरुद्ध फटकावल्या ८१ धावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:49 AM2018-03-20T00:49:42+5:302018-03-20T10:58:39+5:30

औरंगाबादची आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू श्वेता जाधवने भक्कम बचाव आणि आक्रमण याचा सुरेख समन्वय साधताना त्रिवेंद्रम येथे सुरू असलेल्या बीसीसीआयच्या इंटरझोनल महिलांच्या तीनदिवसीय क्रिकेट स्पर्धेत पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करताना ८१ धावांची धीरोदात्त खेळी केली. तिच्या या सुरेख खेळीच्या बळावर पश्चिम विभागाने दक्षिण विभागाविरुद्ध दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद १८५ धावा केल्या आहेत. पश्चिम विभागाला पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी १८ धावांची गरज असून, त्यांचे २ फलंदाज बाकी आहेत. दिवसअखेर प्राजक्ता शिरवाडकर ९ आणि सानिया राऊत एका धावेवर खेळत होती.

 Shweta Jadhav of Aurangabad scored 81 against South Zone | औरंगाबादच्या श्वेता जाधवने दक्षिण विभागाविरुद्ध फटकावल्या ८१ धावा

औरंगाबादच्या श्वेता जाधवने दक्षिण विभागाविरुद्ध फटकावल्या ८१ धावा

googlenewsNext
ठळक मुद्देइंटरझोनल क्रिकेट स्पर्धा : मुग्धा जोशीच्या साथीने केली शतकी भागीदारी

औरंगाबाद : औरंगाबादची आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू श्वेता जाधवने भक्कम बचाव आणि आक्रमण याचा सुरेख समन्वय साधताना त्रिवेंद्रम येथे सुरू असलेल्या बीसीसीआयच्या इंटरझोनल महिलांच्या तीनदिवसीय क्रिकेट स्पर्धेत पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करताना ८१ धावांची धीरोदात्त खेळी केली. तिच्या या सुरेख खेळीच्या बळावर पश्चिम विभागाने दक्षिण विभागाविरुद्ध दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद १८५ धावा केल्या आहेत. पश्चिम विभागाला पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी १८ धावांची गरज असून, त्यांचे २ फलंदाज बाकी आहेत. दिवसअखेर प्राजक्ता शिरवाडकर ९ आणि सानिया राऊत एका धावेवर खेळत होती.

दक्षिण विभागाचा पहिला डाव २0३ धावांत रोखल्यानंतर प्रत्युत्तरात पश्चिम विभागाची सुरुवात सनसनाटी झाली. पहिल्या सहा षटकांतच पश्चिम विभागाने सलामीवीर रेणुका चौधरी (१) आणि पालक पटेल (५) यांना गमावले. त्यात आणखी भर म्हणजे धावफलकावर १४ धावा असताना तिसºया क्रमांकावर असणारी बी. श्रुती (३) हीदेखील धावबाद झाली. ३ बाद १४ अशी दयनीय अवस्था असताना पश्चिम विभागाचे उपकर्णधारपद भूषवणाºया औरंगाबादच्या श्वेता जाधव हिने धीरोदात्त खेळी करताना पश्चिम विभागाचा डाव सावरला. श्वेता जाधव हिने मुग्धा जोशी हिच्या साथीने चौथ्या गड्यासाठी १४0 धावांची भागीदारी करीत पश्चिम विभागाची स्थिती मजबूत केली; परंतु गोहर हिच्या सुरेख चेंडूवर श्वेता त्रिफळाबाद झाल्यानंतर २ बाद १५४ अशी भक्कम स्थिती असणाºया पश्चिम विभागाने त्यांचे ६ फलंदाज अवघ्या २९ धावांत गमावले. पश्चिम विभागाकडून श्वेता जाधवने सर्वाधिक १४८ चेंडूंत ९ खणखणीत चौकार आणि एका गगनभेदी षटकारासह ८१ धावांची सुरेख खेळी केली. तिला साथ देणाºया मुग्धा जोशीने १५0 चेंडूंत ६ चौकारांसह ७३ धावा केल्या. या दोघींशिवाय पश्चिम विभागातर्फे एकाही खेळाडूने दुहेरी आकडी धावा फटकावल्या नाहीत. दक्षिण विभागाकडून कर्णधार गोहरने ५६ धावांत ३ गडी बाद केले. अनन्या उपेंद्रन व आशा एस. यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

तत्पूर्वी, आशा एस. हिच्या ६३ धावांच्या खेळीच्या बळावर दक्षिण विभागाने पहिल्या डावात २0३ धावा केल्या. पश्चिम विभागाकडून रेणुका चौधरी हिने १७ धावांत ४ गडी बाद केले. एच. काझी व श्वेता हरनहाल्ली यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. ८१ धावांची सुरेख खेळी करणाºया श्वेता जाधवला प्रशिक्षक कर्मवीर लव्हेरा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या कामगिरीबद्दल महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वूमेन्स कमिटीचे चेअरमन प्रदीप देशमुख, जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे व सहसचिव शिरीष बोराळकर यांनी श्वेताचे अभिनंदन केले.

संक्षिप्त धावफलक
दक्षिण विभाग (पहिला डाव) : ९९.४ षटकांत सर्वबाद २0३.
(आशा एस. ६३, रेणुका चौधरी ४/१७, एच. काझी २/४९, श्वेता एच. २/२0).
पश्चिम विभाग : ८३ षटकांत ८ बाद १८५. (श्वेता जाधव ८१, मुग्धा जोशी ७३. गोहर ३/५६, आशा एस. २/३१, अनन्या उपेंद्रन २/४).

Web Title:  Shweta Jadhav of Aurangabad scored 81 against South Zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.