लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : उद्योगांना लोडशेडिंग नसतानादेखील आज मंगळवारी अचानकपणे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील ११ के. व्ही.च्या सर्वच फिडरवर दोन टप्प्यांमध्ये लोडशेडिंग करण्यात आली. परिणामी, या औद्योगिक वसाहतीतील लहान-मोठ्या सुमारे ४५० उद्योगांंना एकाच दिवसात जवळपास १०० कोटी रुपयांचा फटका बसला. अचानकपणे करण्यात आलेल्या लोडशेडिंगमुळे संतप्त उद्योजकांनी सायंकाळी ‘मासिआ’च्या नेतृत्वाखाली मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांची भेट घेऊन तात्काळ लोडशेडिंग रद्द करण्याची मागणी केली.
संतप्त उद्योजकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन मुख्य अभियंता गणेशकर यांनी त्यांना शब्द दिला की, उद्यापासून चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील कोणत्याही फिडरवर लोडशेडिंग केली जाणार नाही. ग्रीव्हज्, एलोरा आणि रेडियन्ट अ‍ॅग्रो या तीन फिडरवरूनच लागून असलेल्या ब्रिजवाडी, सिंधीबन, नारेगाव, आंबेडकरनगर, मसनतपूर वसाहतींना वीज पुरवठा होतो. प्रामुख्याने या तीनच फिडरवर वीज हानी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आज अचानक ‘सी’ आणि ‘डी’ वर्गवारी असलेल्या फिडरवर लोडशेडिंगचे आदेश होते. त्यानुसार तेथे लोडशेडिंग करावी लागली. या फिडरवर नागरी वसाहतींना वीज पुरवठा होतो, ही बाब आपणास माहिती नव्हती. असे असले तरी उद्यापासून सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रांत अवघे ५ ते १० मिनिटांसाठी वीज बंद केली जाईल. याची पूर्वकल्पना आपणास दिली जाईल. या ५ ते १० मिनिटांच्या अवधीत सदरील फिडरला एक्स्प्रेस फिडरवरून विद्युत पुरवठा जोडला जाईल. त्यामुळे उद्योगांना अखंडित वीजपुरवठा होईल. नुकसान होणार नाही. येणाºया महिना-दोन महिन्यांमध्ये चिकलठाणा औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र उपकेंद्र उभारले जाईल. त्यानंतर या वसाहतींतील उद्योगांचा विजेचा प्रश्न कायमचा सुटेल, असे आश्वासनही मुख्य अभियंता गणेशकर यांनी यावेळी दिले.
तथापि, बैठक सुरु (पान २ वर)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.