धक्कादायक ! ५ महिन्यांच्या चिमुकलीचा वडिलांनी रागाच्या भरात फेकल्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 07:15 PM2019-05-09T19:15:09+5:302019-05-09T19:24:23+5:30

पती- पत्नीच्या वादातून पतीने बालिकेस दिले फेकून

Shocking ! Death of 5-month-old baby due to father throwing her in anger | धक्कादायक ! ५ महिन्यांच्या चिमुकलीचा वडिलांनी रागाच्या भरात फेकल्याने मृत्यू

धक्कादायक ! ५ महिन्यांच्या चिमुकलीचा वडिलांनी रागाच्या भरात फेकल्याने मृत्यू

googlenewsNext

पिशोर (औरंगाबाद ) : आपल्या पाच महिन्यांच्या चिमुरडीला रागाच्या भरात फेकून दिल्याने गंभीर जखमी झालेल्या या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पित्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. 

खुशी बाबासाहेब जंजाळ (वय ५ महिने) असे मयत बालिकेचे नाव आहे.  बाबासाहेब जंजाळ (रा.रामपूरवाडी) असे आरोपीचे नाव आहे. सपोनि. जगदीश पवार यांनी सांगितले की, रामपूरवाडी येथील बाबासाहेब वाळूबा जंजाळ याचा नेहमी पत्नी मनीषासोबत वाद होत असे. तसेच पत्नीही न्यायालयाच्या आदेशाने नांदायला आली होती. 
दरम्यान, बाबासाहेब याची आई नेहमी पाच महिन्यांची लहान मुलगी खुशी ही आमची मुलगी नाही म्हणून मनीषा हिला हिणवत होती.

६ मे रोजी सायंकाळी बाबासाहेब व पत्नी मनीषा यांच्यात वाद झाला. या वादात त्याने खुशीस उचलून दूर फेकून दिले. यात चिमुकलीच्या छातीस व डोक्याला गंभीर मार लागल्याने तातडीने तिला औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले होते.  मात्र, उपचारादरम्यान बुधवारी खुशीने जगाचा निरोप घेतला. पोलिसांनी बाबासाहेब यास ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस कन्नड न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 
 

Web Title: Shocking ! Death of 5-month-old baby due to father throwing her in anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.