शिवसेना देणार नवीन चेहऱ्यांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:11 AM2018-04-21T00:11:56+5:302018-04-21T00:13:30+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये झालेल्या पक्षाच्या दोन दिवशीय बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी नवीन चेह-यांना संधी देण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली.

Shivsena will give new faces a chance | शिवसेना देणार नवीन चेहऱ्यांना संधी

शिवसेना देणार नवीन चेहऱ्यांना संधी

googlenewsNext
ठळक मुद्देमराठवाड्याचा आढावा : ज्येष्ठ पदाधिका-यांना पक्षकार्य करावे लागणार

औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये झालेल्या पक्षाच्या दोन दिवशीय बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी नवीन चेह-यांना संधी देण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली.
सुभेदारी विश्रामगृहावर मराठवाड्यासह अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील १२ लोकसभा मतदारसंघाबाबत दोन दिवशीय बैठक घेण्यात आली. शुक्रवारी बैठकीची सांगता झाली. या बैठकीत पक्षात नवीन चेहºयांना संधी देण्यासंदर्भात विचार झाल्याचे तसेच तरुणांना आकर्षित करण्यासाठी युवा चेह-यांना प्राधान्य देण्यासंदर्भातही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
गुरुवारी मराठवाड्याचा आढावा घेतल्यानंतर शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर, माढा आणि नगर जिल्ह्यातील दक्षिण नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाºयांसोबत ठाकरे यांनी चर्चा केली. ठाकरे यांनी दोन दिवसांत पदाधिकाºयांसोबत केलेल्या चर्चेत संबंधित मतदारसंघातील शिवसेनेची कमकुवत बाजू आणि शक्तिस्थळे जाणून घेतली. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी काय केले पाहिजे, पक्षात तरुणांना आकर्षित करणारे नवीन चेहरे कोणते आहेत, याविषयी प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाºयांसोबत चर्चा झाली. लोकसभेला संभाव्य उमेदवार कोण असू शकतात, विधानसभेला कोण उभे राहू शकते, याविषयीही चाचपणी करण्यात आली. अधिकाधिक तरुणांना संधी देत अनुभवी, ज्येष्ठ नेत्यांना पक्ष कार्यात सक्रिय करण्याविषयीसुद्धा विचार झाला आहे. स्वबळावर निवडणुका लढण्याचे नियोजन सुरू असल्यामुळे आतापर्यंत ज्या मतदारसंघात शिवसेना पक्षातर्फे निवडणुकाच लढल्या गेल्या नव्हत्या. त्या मतदारसंघामध्ये इतर पक्षांतील स्वच्छ प्रतिमेचा कोणी नेता असेल, तर त्यास पक्षात आणण्याविषयीही चर्चा करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूण शिवसेनेत नवचेतना जागविण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना, पदाधिकाºयांना कार्यान्वित ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा हा दौरा फायदेशीर ठरणार असल्याचे एका पदाधिकाºयाने सांगितले.

Web Title: Shivsena will give new faces a chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.