Shivjayanti: औरंगाबादेत शिवजयंतीचा अपूर्व उत्साह;  'छत्रपती शिवाजी महाराज की जय' च्या घोषणांनी क्रांतीचौक दणाणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 11:58 AM2019-02-19T11:58:49+5:302019-02-19T12:03:09+5:30

अनुयायी शहरातील विविध भागांतून वाहन फेरी काढून अभिवादन करण्यासाठी याठिकाणी एकत्र येत आहेत.

Shivjayanti: An unusual enthusiasm of Shiv Jayanti in Aurangabad; tribute by 'Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai' at Kranti Chowk | Shivjayanti: औरंगाबादेत शिवजयंतीचा अपूर्व उत्साह;  'छत्रपती शिवाजी महाराज की जय' च्या घोषणांनी क्रांतीचौक दणाणला

Shivjayanti: औरंगाबादेत शिवजयंतीचा अपूर्व उत्साह;  'छत्रपती शिवाजी महाराज की जय' च्या घोषणांनी क्रांतीचौक दणाणला

googlenewsNext

औरंगाबाद : 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'; 'जय भवानी जय शिवाजी' अशा विविध घोषणांनी क्रांतीचौक दणाणून गेला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

क्रांती चौक येथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, आमदार सुभाष झांबड , कल्याण काळे, पृथ्वीराज पवार आदी उपस्थित होते. जयंतीनिमित्त शहरातील विविध भागांतून वाहन फेरी काढून अभिवादन करण्यासाठी याठिकाणी एकत्र येत आहेत. यावेळी टीव्ही सेंटर येथून आलेल्या युवती, महिलांच्या दुचाकी रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले . 

हातात ध्वज डोक्यावर पारंपारिक फेटा बांधून शिवप्रेमी क्रांती चौकात दाखल होत आहेत. येणारा प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराज यांचा उत्स्फूर्त जयघोष करत आहे. शिव भक्तांच्या गर्दीने क्रांतीचौक भगवेमय झाले आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय असल्यामुळे उत्साह निर्माण झाला आहे. विविध संस्था, संघटना, कॉलेज, राजकीय पक्ष आणि शिवप्रेमी अभिवादन करण्यासाठी गर्दी करत आहे. क्रांतिचौकात मंच उभारून पोवाड्याचे कार्यक्रम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारून रॅलीत सहभागी झालेले पालक लक्ष वेधून घेत आहेत.

Web Title: Shivjayanti: An unusual enthusiasm of Shiv Jayanti in Aurangabad; tribute by 'Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai' at Kranti Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.