लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान योजनेअंतर्गत कृषी विभागातर्फे ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम जिल्ह्यात ५० टक्के अनुदानावर हरभरा (१५ वर्षावरील वाण) व गहू बियाणे उपलब्ध करून दिले असून महाबीज मार्फत वितरण केले जात आहे. शेतकरीस्तरावर बियाणे बदल दरात वाढ करण्याच्या उद्देशाने उपअभियान हा घटक राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळातर्फे हरभरा बियाणे ६० टक्के किंवा ४ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल, तसेच गहू बियाणे ५० टक्के किंवा १ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल, याप्रमाणे जे कमी असेल ते अनुदानित दराने शेतकºयांना परमीटद्वारे दिले जाईल. जवळच्या महाबीज वितरकाकडे पुरवठा केला जाईल. एका शेतकºयास एक एकर क्षेत्र मयार्देपर्यंत लाभ दिला जाईल. गावाची व लाभार्थ्यांची निवड कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकाºयांकडून केली जाईल. निवडलेल्या लाभार्थ्यांना कृषी विभागातर्फे बियाणे खरेदी करण्याचे परमीट दिले जाईल. निवड झालेल्या लाभार्थी शेतकºयांना सात-बारा उतारा, आधारकार्ड व मोबाईल क्रमांक संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकाºयांकडे सादर करून परमीट घ्यावे. त्यात सर्वसाधारण प्रवर्ग ३५ टक्के, अनुसूचित जाती प्रवर्ग ३५ टक्के आणि अनुसूचित जमाती प्रवर्ग ३० टक्के याप्रमाणे निवड करण्यात येईल.
हरभरा बियाणेसाठी तालुकानिहाय नियोजनाची आकडेवारी क्विंटलमध्ये : हिंगोली - १२५, कळमनुरी - १२९, वसमत - १२५, औंढा नागनाथ - १२५, सेनगांव - १२५ एकूण ६२९ तसेच गहु बियाणे क्विंटलमध्ये : हिंगोली - १०९, कळमनुरी - १०६, वसमत - १०६, औंढा नागनाथ - १०६, सेनगांव - १०६ एकूण ५३३ उर्वरित बियाण्याची उचल करावी. अधिक माहिती व परमीटसाठी कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.