जंजाळा, वेताळवाडी किल्ला परिसरात सागवान तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:50 AM2018-02-18T00:50:21+5:302018-02-18T00:50:28+5:30

श्यामकुमार पुरे सिल्लोड : सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील जंजाळा, वेताळवाडी डोंगर रांगातील राखीव वनक्षेत्रातून मौल्यवान सागवान लाकडांची तस्करी सुरु असून याकडे वन विभागाचे दुर्लक्ष आहे की त्यांच्या सहमतीने हा गोरखधंदा सुरु आहे, हे मात्र कोडेच आहे.

 Savjwan smuggling in Janjala, Vetalwadi fort | जंजाळा, वेताळवाडी किल्ला परिसरात सागवान तस्करी

जंजाळा, वेताळवाडी किल्ला परिसरात सागवान तस्करी

googlenewsNext

श्यामकुमार पुरे
सिल्लोड : सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील जंजाळा, वेताळवाडी डोंगर रांगातील राखीव वनक्षेत्रातून मौल्यवान सागवान लाकडांची तस्करी सुरु असून याकडे वन विभागाचे दुर्लक्ष आहे की त्यांच्या सहमतीने हा गोरखधंदा सुरु आहे, हे मात्र कोडेच आहे.
रात्री -अपरात्री या जंगलातील सागवानांची मोठमोठी झाडे कापून त्याची विल्हेवाट लावली जात आहे. सागवान लाकडांपासून बनविलेल्या टेबल, खुर्ची व इतर साहित्याला मोठी मागणी असते. नेमका हाच धागा पकडून १५ ते २० जणांच्या टोळीने हा धंदा सुरु केला आहे. जळगाव, बºहाणपूर, औरंगाबाद, पाचोरा येथे या लाकडांची विक्री केल्या जाते. दिवसेंदिवस सागवानांची झाडे तोडली जात असल्याने या डोंगरातून सागवान नामशेष झाल्यास आश्चर्य वाटू नये. सिल्लोड तालुक्यातील नानेगाव हे या अवैध धंद्याचे केंद्रबिंदू आहे.
नानेगाव, जंजाळा हे गाव सिल्लोड तालुक्यात येते, मात्र या गावाला लागून जंजाळा, केळगाव, मुर्डेश्वर, वेताळवाडी किल्ला आहे. या शिवाय जरंडी, सोयगाव वनपरिक्षेत्रात ९ हजार ३९९ हेक्टर घनदाट अरण्य आहे. जिल्ह्यापासून या डोंगराचे अंतर लांब असल्याने अधिकारी इकडे फिरकत नाही. याचा फायदा घेऊन सागवान तस्करी करणाºया टोळ्या या परिसरात कार्यरत आहेत.
दिवसा झाडांचा शोध घेणे व निशाणी करून प्रचलित कटिंग मशीनद्वारे रात्री हिरवी सागवान झाडे तोडण्याची तस्करांची पद्धत आहे.
चंदन नामशेष
सिल्लोड, सोयगाव, अजिंठा वन परिक्षेत्रातील नानेगाव, जंजाळा, भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार ही गावे चंदन तस्करांची गावे म्हणून ओखळली जातात. अनेक कारवाया करूनही या परिसरातील तस्करांवर वन विभाग अंकुश लावू शकला नाही. परिणामी या वनपरिक्षेत्रातील चंदन नामशेष झाले आहे. हीच परिस्थिती राहिली तर आता सागवान नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही.
जम्बो कारवाईची गरज
सध्या सागवान तस्कर कुºहाडी, रायफल, शस्र घेऊन डोंगरात वावरतात. यामुळे भीती अन हप्त्याची लालसा यामुळे काही कर्मचारी जीव वाचवून नोकरी करतात. परिणामी तस्करांच्या दहशतीने कुणी याविरोधात आवाज उठवत नाही. त्यामुळे मोठा फौजफाटा घेऊन जम्बो कारवाई केल्यास सागवान वाचू शकेल.
नानेगावात मशीनद्वारे होते कटाई
जंगलातून चोरून आणलेली लाकडे नानेगावात साठविली जातात. या गावात घराघरात २५ ते ३० कटाई मशीन आहेत. त्याद्वारे खुलेआम विनापरवाना रस्त्यावर सागवान कापून त्याचे फर्निचर तयार करून जळगाव, औरंगाबाद, विदर्भ, खान्देशमध्ये विक्री केल्या जाते.
आड रस्त्याने जातात वाहने
कटाई करून तोड केलेले सागवान, त्याचप्रमाणे नानेगावात फर्निचर तयार करून ते ट्रकद्वारे अजिंठा, कन्नड तालुका, पाचोरा मार्गे, बाबरा, अंधारीमार्गे आड रस्त्याने पास केले जातात.

Web Title:  Savjwan smuggling in Janjala, Vetalwadi fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.