सटाणा येथे साडेतीन लाखांचा ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 06:18 PM2019-06-02T18:18:57+5:302019-06-02T18:19:11+5:30

येथून जवळच असलेल्या सटाणा येथील घरातून चोरट्यांनी साडेतीन लाखांचा ऐवज लांबविला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर २ ते पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली.

 At Santana, the property was reduced to three and a half lakhs | सटाणा येथे साडेतीन लाखांचा ऐवज लांबविला

सटाणा येथे साडेतीन लाखांचा ऐवज लांबविला

googlenewsNext

करमाड : येथून जवळच असलेल्या सटाणा येथील घरातून चोरट्यांनी साडेतीन लाखांचा ऐवज लांबविला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर २ ते पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली.


सटाणा फाट्याजवळ सचिन बाबासाहेब घावटे यांचे घर आहे. शुक्रवारी रात्री जेवण करून सर्व कुटुंबातील व्यक्ती रात्री १० वाजेच्या सुमारास घराला बाहेरून कुलूप लावून गच्चीवर झोपले होते. तर बाबासाहेब घावटे हे घरासमोर झोपले होते. शनिवारी मध्यरात्रीनंतर २ ते ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी मागील दरवाजाचा कोंडा तोडून घरात प्रवेश केला.

यावेळी कपाटाला कुलूप नसल्याने चोरट्यांनी कपाटातील रोख ३७ हजार तसेच सोन्याचे झुंबर, साखळ्या, नेकलेस काळी पोत, फॅन्सी पॅड असा एकूण ११ तोळ्यांचे ३ लाख रुपये किमतीचे दागिने असे एकूण ३ लाख ३७ हजारांचा ऐवज लांबविला. सकाळी उठल्यावर ही घटना घावटे कुटुंबियांच्या लक्षात आली. करमाड पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. परंतु श्वान पथकाला माग काढता आला नाही.


घटनास्थळी प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी राठोड, पोलीस निरीक्षक अजिनाथ रायकर यांनी भेट दिली. सचिन बाबासाहेब घावटे यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, गणेश जागडे, रमेश धस, सचिन राठोड, नागनाथ केंद्रे तपास करीत आहे.

Web Title:  At Santana, the property was reduced to three and a half lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.