लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : 'सामान्य ते असामान्य स्त्री' असा प्रवास करणाºया स्त्रियांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी लोकमत 'सखी मंच'च्या वतीने ११ नोव्हेंबर रोजी शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता कुसुम सभागृहात 'सखी सन्मान पुरस्कार' वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आहे़ सामाजिक, शैक्षणिक, कला साहित्य, सांस्कृतिक, वैद्यकीय, शौर्य, उद्योजकता, जीवनगौरव अशा विविध क्षेत्रांत कार्य करणाºया आठ महिलांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे़ शैक्षणिक, सामाजिक, साहित्य, क्रीडा, आरोग्य आदी वेगवेगळ्या भागात भरीव काम करणाºया, प्रसिद्धीपासून दूर राहून आपल्या कार्याचा ठसा उमटविणाºया आठ सखींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे़ यावेळी क्षणोक्षणी हास्याची कारंजी उडविणारा सादरकर्ते झी टॉकीज तडका व झी मराठी हास्यसम्राट फेम प्रा़अजितकुमार कोष्टी यांचा 'हसवणूक' हा बहारदार कार्यक्रम होणार आहे़ सखींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे़