साई काणे अकॅडमी, पंकज युनायटेड संघात विजेतेपदाची झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:43 AM2018-03-25T00:43:41+5:302018-03-25T00:44:20+5:30

गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत व्यंकटेश काणे याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर साई काणे अकॅडमीने उपांत्य फेरीत हसनान देवळाई संघावर ८ गडी राखून मात केली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कन्नडच्या प्रवीण कुलकर्णीने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर पंकज युनायटेड संघाने लकी सी. सी. संघावर १८ धावांनी मात केली. या दोन संघात उद्या सकाळी ९ वाजता विजेतेपदाची झुंज रंगणार आहे.

Sai Kane Academy, Pankaj United team title winners | साई काणे अकॅडमी, पंकज युनायटेड संघात विजेतेपदाची झुंज

साई काणे अकॅडमी, पंकज युनायटेड संघात विजेतेपदाची झुंज

googlenewsNext
ठळक मुद्देक्रिकेट स्पर्धा : व्यंकटेश काणे, प्रवीण कुलकर्णी सामनावीर

औरंगाबाद : गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत व्यंकटेश काणे याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर साई काणे अकॅडमीने उपांत्य फेरीत हसनान देवळाई संघावर ८ गडी राखून मात केली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कन्नडच्या प्रवीण कुलकर्णीने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर पंकज युनायटेड संघाने लकी सी. सी. संघावर १८ धावांनी मात केली. या दोन संघात उद्या सकाळी ९ वाजता विजेतेपदाची झुंज रंगणार आहे.
सकाळच्या सत्रात झालेल्या लढतीत साई काणे अकॅडमीने हसनान देवळाई संघाला २० षटकांत ७ बाद ९५ धावांत रोखले. देवळाई संघाकडून नीलेश राठोडने २ चौकारांसह नाबाद २७ व मोबीन सय्यदने २१ धावा केल्या. साई काणे अकॅडमीकडून ऋषिकेश काळेने २१ धावांत २ गडी बाद केले. त्याला रामेश्वर दौड, शोएब सय्यद, स्वप्नील पठाडे, व्यंकटेश काणे, नचिकेत मुळक, झुबेर कुरैशी यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली. प्रत्युत्तरात साई काणे अकॅडमीने विजयी लक्ष्य १६.५ षटकांत २ गडी गमावत सहज गाठले. त्यांच्याकडून व्यंकटेश काणे याने ४८ चेंडूंत २ चौकारांसह नाबाद ४३ आणि नचिकेत मूळकने ३६ चेंडूंत २ चौकारांसह नाबाद ३४ धावा केल्या.
दुसºया उपांत्य सामन्यात प्रवीण क्षीरसागरने ३१ चेंडूंतच ५ टोलेजंग षटकार व ५ खणखणीत चौकारांसह केलेल्या वादळी ७१ धावांच्या खेळीच्या बळावर पंकज युनायटेडने २० षटकांत ७ बाद १७९ धावा ठोकल्या. प्रवीणशिवाय ऋषिकेश नायरने ३ चौकारांसह ३४, सतीश भुजंगेने १७ व सचिन शेडगेने १४ धावा केल्या. लकी सी.सी.कडून अबू एस. याने २८ धावांत ३, तर सय्यद शमीउद्दीन याने २ गडी बाद केले. वसीम शेख व सय्यद वहाब यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात लकी सी.सी. संघ २० षटकांत ९ बाद १६१ धावा करू शकला. त्यांच्याकडून अली चाऊसने १८ चेंडूंत ३ षटकार व २ चौकारांसह सर्वाधिक ३६ धावा केल्या. अमित पाठकने २४, सोहेल मुसाने २२ धावांचे योगदान दिले. पंकज युनायटेडकडून सय्यद वहीदने ३२ धावांत ३, तर विजय ढेकळे व सचिन शेडगे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. ऋषिकेश नायरने १ गडी बाद केला.

Web Title: Sai Kane Academy, Pankaj United team title winners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.