कुलसचिवपदी साधना पांडे यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 12:40am

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदी विधि विभागाच्या प्रमुख डॉ. साधना पांडे यांची नियुक्ती केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदी विधि विभागाच्या प्रमुख डॉ. साधना पांडे यांची नियुक्ती केली आहे. त्या पहिल्या महिला कुलसचिव बनल्या असून, सायंकाळी उशिरा त्यांनी पदभार स्वीकारला. डॉ. प्रदीप जब्दे हे राजीनामा देऊन मूळ पदावर रु जू होणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये शुक्रवारी प्रकाशित झाले होते. त्यावर शिक्कामोर्तब झाले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी १४ नोव्हेंबर रोजी संपणार होता. मात्र त्यापूर्वीच त्यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात प्राचार्यपदी रुजू होण्यास प्राधान्य दिले. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे शुक्रवारी सकाळीच राजीनामा सादर केला होता. हा राजीनामा कुलगुरूंनी सायंकाळच्या सुमारास मंजूर केला. तत्पूर्वी कुलगुरूंनी प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सी. जे. हिवरे, डॉ. प्रवीण वक्तेंसह इतर ज्येष्ठ प्राध्यापकांना कुलसचिवपदाचा पदभार घेण्याविषयी विचारणा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, ज्येष्ठ प्राध्यापक पदभार घेण्यास तयार होत नसल्यामुळे विधि विभागाच्या प्रमुख डॉ. साधना पांडे यांच्याशी सविस्तर चर्चा करून पदभार घेण्यास सांगितले. यानंतर डॉ. पांडे यांनी सायंकाळच्या वेळी पदभार स्वीकारला. डॉ. साधना पांडे या विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्या महिला कुलसचिव ठरल्या आहेत. तर कुलगुरूंच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळतील कुलसचिवांच्या संख्येत एकाने भर पडत ही संख्या १५ वर पोहोचली आहे.

संबंधित

तिसरा डोळा नावालाच
ढगाळ वातावरणामुळे बीड जिल्ह्यात तूर उत्पादक चिंतेत
बीडमध्ये नाफेडच्या खरेदी केंद्रांना शेतक-यांची प्रतीक्षा
बीडमध्ये भिकारी युवतीवर अत्याचार
बीड क्रीडा कार्यालयाचा ‘खेळ’ बिघडला !

औरंगाबाद कडून आणखी

महामॅरेथॉनच्या फिटनेस पार्टीत औरंगाबादकरांचा दणक्यात ‘रॉकआॅन’
जि.प.चे कार्य दुबळे आहे का?
ए-१ श्रेणीच्या उंबरठ्यावर रेल्वेस्टेशन
विभागात ४ लाख २६ हजार कुटुंबे शौचालयाविना
प्रतिभावान, कार्यक्षम न्यायमूर्ती देणारे हे खंडपीठ

आणखी वाचा