लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लोकमत समूहाने अनेक समाजोपयोगी आणि अनेक प्रतिष्ठित स्पर्धांचे आयोजन करून शहरातील कलावंत व खेळाडूंना व्यासपीठ मिळवून दिले आहे. आता १७ डिसेंबर रोजी सॅफरॉन लॅण्डस्मार्क प्रस्तुत औरंगाबाद महामॅरेथॉनचे आयोजन करून नागरिकांत तंदुरुस्तीचा नवा संदेश देत असतानाच ऐतिहासिक शहरात फिटनेससाठी ‘रनिंग संस्कृती’ रुजवण्याचे उल्लेखनीय कार्य करीत आहे. विशेष म्हणजे ३ कि. मी. आणि ५ कि. मी. धावमार्गावर धमाल असल्यामुळे धावपटूंत उत्साह, उत्स्फूर्तता व ऊर्जा यांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.
औरंगाबाद शहरात फिटनेसविषयी प्रचंड जागरूकता निर्माण झाली आहे आणि त्यात लोकमत समूहदेखील महामॅरेथॉनचे आयोजन करून नागरिकांमध्ये तंदुरुस्तीचे महत्त्व रुजवण्यासाठी महत्त्वाचे योगदान देत आहे. शहरातील विद्यापीठ परिसर, गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुल, सिडकोतील गरवारे क्रीडा संकुल येथे भल्या पहाटेच हजारो नागरिक, खेळाडू तंदुरुस्तीसाठी धावत आहेत. यात विशेष म्हणजे पूर्णच्या पूर्ण कुटुंबदेखील आपले आरोग्य चांगल्यासाठी फिटनेस करतानाचे चित्र आहे. विशेषत: नागरिकांत ५ कि.मी. व ३ कि.मी. धावण्याचा सराव करणा-यांची संख्या शहरात प्रचंड आहे आणि औरंगाबाद येथे लोकमत समूहातर्फे आयोजित १७ डिसेंबर रोजी होणारी महामॅरेथॉनदेखील कुटुंब, नागरिक आणि खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ३ कि.मी. फॅमिली रनमध्ये आई, वडील व १२ वर्षांखालील २ मुले यांचा समावेश आहे.
गतवर्षीच्या मॅरेथॉनमध्ये ३ आणि ५ कि. मी.च्या मार्गावर धमाल, मस्ती आणि मजा यांचा अवर्णनीय असा सुरेख मिलाफ होता. अफलातून असे सांस्कृतिक कला सादर करणा-यांनी या मॅरेथॉनमध्ये धमाल उडवून दिली होती. त्यामुळे ५ आणि ३ कि. मी. सहभागी होणा-या धावपटूंत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. औरंगाबाद येथे १७ डिसेंबर रोजी महामॅरेथॉन होणार असल्याची घोषणा होताच सराव करणाºयांत प्रचंड वाढ झाली. गत वेळेप्रमाणेच शहरातील विविध खेळांतील खेळाडूंमध्येही या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची उत्सुकता वाढली आहे.

 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.