भुयारी मार्गासाठी रास्तारोको, विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:48 PM2017-07-24T18:48:43+5:302017-07-24T18:48:43+5:30

सोलापूर- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरण कामात भुयारी मार्ग तयार करावा, या मागणीसाठी तामलवाडी ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी रास्तारोको आंदोलन केले़.

Rastaroko for the subway, spontaneous participation of the students | भुयारी मार्गासाठी रास्तारोको, विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग

भुयारी मार्गासाठी रास्तारोको, विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग

googlenewsNext

भुयारी मार्गासाठी रास्तारोको, विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग

 
उस्मानाबाद : सोलापूर- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरण कामात भुयारी मार्ग तयार करावा, या मागणीसाठी तामलवाडी ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी रास्तारोको आंदोलन केले़. विशेष म्हणजे गावातील हजारो विद्यार्थ्यांनीही या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला़. जवळपास दीड तास करण्यात आलेल्या आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती़
 
तामलवाडी ग्रामस्थांनी १९ जुलै रोजी सोलापूर येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या प्रकल्प संचालकांना निवेदन देऊन भुयारी मार्गाची मागणी केली होती़. गावातील शाळा, महाविद्यालय, पोलीस ठाणे, बँक आदी महत्त्वाची कार्यालये गावाच्या पूर्व बाजूस आहेत़. राष्ट्रीय महामार्ग विभागाने भुयारी मार्ग तयार करताना ग्रामस्थांना विश्वासात न घेता गावाबाहेर दूर केला असून, हा मार्ग गावापासून अर्धा किलोमीटर दूर आहे़. ग्रामस्थांची होणारी गैरसोय पाहता नव्याने भुयारी मार्ग महाराष्ट्र बँकेसमोरून जाणाºया रस्त्यावर तयार करावा या मागणीसाठी सरपंच ज्ञानेश्वर माळी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी व एक हजार विद्यार्थ्यांनी सोमवारी एक ते दीड तास रास्तारोको आंदोलन केले़.
 
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी आंदोलकांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़ यावेळी सरपंच ज्ञानेश्वर माळी यांच्यासह उपसरपंच दत्तात्रय वडणे, बसवणप्पा मसुते, शिवदास पाटील, मारूती पाटील, सुधीर पाटील, हमिद पठाण, आब्बास पटेल, डॉ़ प्रकाश माळी, पांडुरंग लोंढे, वडगाव काटीचे तंटामुक्त समिती अध्यक्ष नरसिंग धावणे, सरपंच संपत शेंडगे, हनमंत गवळी, आकाश चोरघडे, हुसेन पटेल, जिल्हा परिषद सदस्य शहाजी लोंढे, रहेमान बेगडे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष निरंज करंडे, दत्ता घोटकर, सुधीर गायकवाड, मल्लिकार्जुन मसुते, माजी सरपंच ज्ञानोबा राऊत, शाहीर गायकवाड,  श्रीकांत गायकवाड, इकबाल शेख यांच्यासह ग्रामस्थ, जिल्हा परिषद, सरस्वती विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते़ यावेळी सपोनि नितीन मिरकर यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता़
 
आंदोलनाकडे अधिकाºयांची पाठ
तामलवाडी ग्रामस्थांनी भुयारी मार्गासाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचे निवेदन प्रकल्प संचालकांना दिले होते़ सोमवारी आंदोलनही करण्यात आले़ मात्र, प्रकल्प संचालकांसह महामार्ग विभागाच्या इतर अधिकाºयांनी या आंदोलनाकडे पाठ फिरविली़ तर पुणे येथील बैठकीचे कारण पुढे करण्यात आले़ महामार्ग विभागाचे अधिकारी न आल्याने संताप व्यक्त होत होता़ 
 
दबाव तंत्राचा वापर
महामार्गाचे काम सुरू असताना पोलीस बळाचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला़ सांगवी काटी येथे झोपडपट्टी भागात भुयारी मार्ग करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते़ त्यावेळीही अधिकारी फिरकले नाहीत़ एक वर्षाचा कालावधी लोटला तरी तेथील प्रश्नही कायम आहे़ तामलवाडी येथेही पोलीस बळाचा वापर करून दबावतंत्र वापरले जात असल्याचा आरोप करण्यात आला़
 
आज होणार बैठक
तामलवाडी येथील भुयारी मार्गासाठी उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग अधिकाºयांसमवेत मंगळवारी बैठक होणार आहे़ या बैठकीत आवश्यक तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी दिली़

Web Title: Rastaroko for the subway, spontaneous participation of the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.