क्रांतीचौक येथील छत्रपतींचा पुतळा उंचावणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, February 10, 2018 1:01am

क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी शहरातील संतप्त शिवप्रेमींनी महापालिका मुख्यालयात ‘हल्लाबोल’केला. त्यामुळे महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करून शिवप्रेमींसोबत चर्चा करण्यात आली. १९ फेब्रुवारी रोजी उंची वाढविण्याच्या कामाचे नारळ फोडण्यात येईल.

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी शहरातील संतप्त शिवप्रेमींनी महापालिका मुख्यालयात ‘हल्लाबोल’केला. त्यामुळे महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करून शिवप्रेमींसोबत चर्चा करण्यात आली. १९ फेब्रुवारी रोजी उंची वाढविण्याच्या कामाचे नारळ फोडण्यात येईल. विविध शासकीय कार्यालयांच्या परवानग्या घेऊन तब्बल ८० लाख रुपये खर्च करून दिमाखदार चौक उभारण्याचे आश्वासन महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले. शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिका-यांसह शहरातील शिवप्रेमी तरुण दुपारी ४ वाजता महापालिकेत प्रचंड घोषणाबाजी करीत दाखल झाले. त्यामुळे महापौरांनी सभा काही वेळेसाठी तहकूब करून स्थायी समितीच्या सभागृहात शिष्टमंडळासोबत चर्चा केली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवा, असा ठराव दोन वेळेस २०१३ मध्ये घेण्यात आला. आजपर्यंत प्रशासनाने त्यावर कारवाई का केली नाही, असा जाब मनपा पदाधिकारी, अधिका-यांना विचारण्यात आला. महापालिका आर्थिकरीत्या डबघाईस आलेली आहे, मनपाने एनओसी द्यावी, ८० लाख रुपये एका तासात उभे करण्यात येतील. मनपा प्रशासनावर आमचा अजिबात विश्वास राहिलेला नाही, असेही विनोद पाटील, अभिजित देशमुख यांनी सांगितले.

संबंधित

शेतक-यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे - रामदेव बाबा
सौंदर्य कार्यशाळेस सखींचा प्रतिसाद
परतूर-आष्टी रस्ता बनला मृत्यूचा सापळा
इज्तेमासाठी देश-विदेशातून जनसागर
सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी दोन निविदा

औरंगाबाद कडून आणखी

अखेर पैठण तालुक्यातील जि. प. शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेत झाले जमा
...तर पाणीच मिळणार नाही
औरंगाबाद जिल्ह्यात ३४० मुलांना जीवनदान
राज्यस्तरीय इज्तेमाला औरंगाबादेत उत्साहात सुरुवात
...तर शेतकरी पुन्हा संप करतील

आणखी वाचा