जालना जिल्ह्यात उन्हाळ्यात पावसाळी वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:33 AM2018-03-17T00:33:59+5:302018-03-17T00:34:08+5:30

मार्चमध्ये रखरखते ऊन तापण्यास सुरुवात झालेली असताना, शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झाले नाही. जिल्ह्यात बहुतांश भागात अधून-मधून पावसाची रिमझिम सुरू होती. ऐन गहू, ज्वारी, हरभरा काढणीच्या वेळेस पावसाने हजेरी लावल्यामुळे बहुतांश भागात ज्वारी सोंगणी, गहू काढणीच्या कामे उरकण्यात बळिराजा व्यस्त असल्याचे दिसून आले.

Rainy atmosphere in Jalna district during summer | जालना जिल्ह्यात उन्हाळ्यात पावसाळी वातावरण

जालना जिल्ह्यात उन्हाळ्यात पावसाळी वातावरण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मार्चमध्ये रखरखते ऊन तापण्यास सुरुवात झालेली असताना, शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झाले नाही. जिल्ह्यात बहुतांश भागात अधून-मधून पावसाची रिमझिम सुरू होती. ऐन गहू, ज्वारी, हरभरा काढणीच्या वेळेस पावसाने हजेरी लावल्यामुळे बहुतांश भागात ज्वारी सोंगणी, गहू काढणीच्या कामे उरकण्यात बळिराजा व्यस्त असल्याचे दिसून आले.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठवाड्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शहरात गुरुवारी मध्यरात्री दहा ते पंधरा मिनिटे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. शुक्रवारी सकाळी, तसेच दुपारी काही मिनिटे तुरळक पाऊस झाला. घनसावंगी तालुक्यात सकाळी रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे काही भागात काढणीस आलेला गहू, हरभरा भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अंबड तालुक्यात अंकुशनगर, महाकाळा, वडीगोद्री या भागात सकाळी साडेदहाच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शहागड परिसरातील दिवसभर ढगाळ वातावरण होते. मंठा तालुक्यातील तळणी परिसरात सकाळी हलका पाऊस झाला. परतूर तालुक्यातही दिवसभर ढगाळ वातावरण होते. भोकरदन, आव्हाना, पारध पसिरात हलका पाऊस झाला. सध्या काही भागात गहू शेतात उभा आहे. त्यामुळे गहू सोगण्यासाठी शेतकºयांची धांदल उडाली. बेमोसमी पाऊसामुळे हाताशी आलेले पीक वाया जाण्याच्या भितीने शेतकºयांची चिंता वाढली आहे.

Web Title: Rainy atmosphere in Jalna district during summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.