सलग तिसºया दिवशीही पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:33 AM2017-08-22T00:33:04+5:302017-08-22T00:33:04+5:30

जिल्ह्यात गेल्या महिनाभराच्या काळात पहिल्यांदाच जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यातही हिंगोली तालुक्यात काल आणि आजही त्या तुलनेत चांगला पाऊस झाला नसल्याचे चित्र असून इतर तालुक्यांत मात्र नदी-नाले वाहते झाल्याचे चित्र आहे. या पावसामुळे शेतकºयांचा पोळा हा सण मात्र आनंदात गेला आहे.

Rain for 3rd consecutive day | सलग तिसºया दिवशीही पाऊस

सलग तिसºया दिवशीही पाऊस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात गेल्या महिनाभराच्या काळात पहिल्यांदाच जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यातही हिंगोली तालुक्यात काल आणि आजही त्या तुलनेत चांगला पाऊस झाला नसल्याचे चित्र असून इतर तालुक्यांत मात्र नदी-नाले वाहते झाल्याचे चित्र आहे. या पावसामुळे शेतकºयांचा पोळा हा सण मात्र आनंदात गेला आहे.
हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे. पावसाची भुरभुर तर तीन दिवसांपासून होत आहे. त्यात दोन दिवस अधून-मधून जोरदार पर्जन्यवृष्टीही झाली. विशेषत: रात्रीच्या वेळी पावसाने दोन दिवसही झोपडून काढले. त्यामुळे जिल्ह्यात सरासरी ४६ व ३४ मिमी असा दोन दिवस पाऊस झाला. यामुळे सोयाबीनला फारसा फायदा होणार नाही. उडीद तर आधीच काढणीला आले आहेत. बºयाच ठिकाणी तर काढलेही आहेत. मूगही आता काही दिवसांतच काढणीत येणार आहेत. हलक्या जमिनीतील सोयाबीनची तर वाढ खुंटली होती. शिवाय झाडाची खालच्या भागातील पानेही वाळून जात होती. त्याचबरोबर शेंगाही कमीच लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पेरणी झालेल्या या पिकाला कितपत फायदा होईल, हे सांगणे अवघड आहे.
कोरडेठाक असलेले नदी-नाले एकदाचे वाहते झाले, एवढेच समाधान. तर भिज पावसामुळे जमिनीत पाणी मुरल्याने भूगर्भातील पाणीपातळी काही प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे. मात्र एक-दोन वगळता इतर कोणत्याच ठिकाणचे लघुप्रकल्पही भरले नाहीत. त्यामुळे यंदा टंचाईचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी आणखी पावसाची प्रतीक्षा शेतकºयांना आहे. खरिपातील काही पिके तर आधीच हातची गेली आहेत. निदान रबीला तरी फायदा व्हावा, यासाठी आणखीही पावसाची गरज आहे.
पोळा आनंदात
चांगले पर्जन्य झाल्यामुळे पोळा मात्र आनंदात गेला आहे. दुष्काळी सावटामुळे चिंतेत असलेल्या शेतकºयांनी पावसाचे आगमन होताच पोळा धूमधडाक्यात साजरा केला. या पोळ्यात पावसासोबतच उत्साहही आल्याचे चित्र होते.
मंडळनिहाय पाऊस
हिंगोली-११, खांबाळा-१0, माळहिवरा-१२, सिरसम बु.-७, बासंबा-१८, नर्सी ना.-२६, डिग्रस-२९, कळमनुरी-५0, नांदापूर-२४, आखाडा बाळापूर-३४, डोंगरकडा-३३, वारंगा फाटा-३४, वाकोडी-१७, सेनगाव-७0, गोरेगाव-४0, आजेगाव-१२, साखरा-३३, पानकनेरगाव-१८, हत्त्ता-६६, वसमत-१५, हट्टा-४५, गिरगाव-२१, कुरुंदा-६९, टेंभूर्णी-१४, आंबा-६0, हयातनगर-१७, औंढा नागनाथ-६0, जवळा बाजार-४८, येहळेगाव-४६, साळणा-४५ मिमी असे मंडळनिहाय पर्जन्यमान आहे. तर जिल्ह्याची एकूण सरासरी ३४.४३ एवढी आहे.

Web Title: Rain for 3rd consecutive day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.