ए-१ श्रेणीच्या उंबरठ्यावर रेल्वेस्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:41 AM2017-11-20T00:41:44+5:302017-11-20T00:41:48+5:30

औरंगाबादचे ‘ए’ श्रेणीतील मॉडेल रेल्वेस्टेशन ए-१ श्रेणीच्या उंबरठ्यावर उभे आहे. प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून रेल्वेस्टेशनवर वर्षाला सुमारे ५५ कोटींचे उत्पन्न मिळत आहे. एन-१ श्रेणीत समावेश होण्यासाठी ६० कोटींवर उत्पन्न आवश्यक असल्याने अवघ्या ५ ते ६ कोटींनी उत्पन्न वाढीची गरज आहे.

 Railway Station at the threshold of A-1 | ए-१ श्रेणीच्या उंबरठ्यावर रेल्वेस्टेशन

ए-१ श्रेणीच्या उंबरठ्यावर रेल्वेस्टेशन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : औरंगाबादचे ‘ए’ श्रेणीतील मॉडेल रेल्वेस्टेशन ए-१ श्रेणीच्या उंबरठ्यावर उभे आहे. प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून रेल्वेस्टेशनवर वर्षाला सुमारे ५५ कोटींचे उत्पन्न मिळत आहे. एन-१ श्रेणीत समावेश होण्यासाठी ६० कोटींवर उत्पन्न आवश्यक असल्याने अवघ्या ५ ते ६ कोटींनी उत्पन्न वाढीची गरज आहे.
या श्रेणीत समावेश झाल्यास अधिक गतीने रेल्वेस्टेशनचा विकास होण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक डॉ. ए. के. सिन्हा यांनी सांगितले.
औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर रविवारी (दि. १९) पत्रकार परिषदेत डॉ. सिन्हा यांनी ही माहिती दिली. ‘ए’ श्रेणीत असलेल्या औरंगाबाद रेल्वेस्टेशनचा मॉडेल रेल्वेस्टेशनमध्ये समावेश झाला. यामध्ये पहिल्या टप्प्यात रेल्वेस्टेशनची नवीन इमारत उभी राहिली. दुसºया टप्प्यात जुन्या रेल्वेस्टेशनचा विकास केला जाणार आहे.
रेल्वेस्टेशनवर सध्या प्लॅटफॉर्म एक आणि दोनवर लिफ्ट आणि सरकता जिना आहे. त्याबरोबरच मोफत वायफायची सुविधा आहे. ८ ते ६० कोटींपर्यंत उत्पन्न असलेल्या रेल्वेस्टेशनचा समावेश ‘ए’ श्रेणीत केला जातो. तर ६० कोटींवर उत्पन्न असलेल्या स्टेशनचा ए-१ श्रेणीत समावेश होतो. औरंगाबाद रेल्वेस्टेशनचे उत्पन्न सध्या वार्षिक सुमारे ५० ते ५५ कोटी रुपये आहे. त्यामुळे मॉडेल रेल्वेस्टेशन आता ए-१ श्रेणीत समावेश होण्यासाठी दरवाजा ठोठावत आहे. त्यासाठी केवळ ५ ते ६ कोटींनी उत्पन्न वाढीची गरज आहे. या श्रेणीत रेल्वेस्टेशनचा समावेश करण्याचे ध्येय ‘दमरे’च्या नांदेड विभागाचे असल्याचे डॉ. सिन्हा म्हणाले.

Web Title:  Railway Station at the threshold of A-1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.