रांजणगावात मामांनी केला भाचीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 09:36 PM2019-07-04T21:36:49+5:302019-07-04T21:37:00+5:30

नात्याने भाची असलेल्या १९ वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोघा नराधाम मामाविरुध्द गुरुवारी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rages have been tortured in Ranjanga | रांजणगावात मामांनी केला भाचीवर अत्याचार

रांजणगावात मामांनी केला भाचीवर अत्याचार

googlenewsNext

वाळूज महानगर : नात्याने भाची असलेल्या १९ वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोघा नराधाम मामाविरुध्द गुरुवारी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नात्याला काळीमा फासणाºया या घटनेमुळे औद्योगिक परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.


उत्तरप्रदेशातील एका महिलेने तिचा भाऊ शाहरुख खान यास वर्षभरापूर्वी काही पैसे उसणे दिले होते. काही दिवसांनी त्या महिलेने पैशाची मागणी केली असता त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे शहारुख त्याचा भाऊ अब्दुल्ला या दोघांचा बहीण व मेव्हण्यासोबत वाद झाला होता. यानंतर एक-दीड महिन्यानंतर शहारुख व अब्दुल्ला हे बहिणीच्या घरी गेले.

दरम्यान, तेथे गेल्यानंतर त्यांनी भाचीला रोजगाराच्या निमित्ताने औरंगाबादला आणले. वाळूज एमआयडीसीतील रांजणगावात ते भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहू लागले. दरम्यान, शाहरुखने ही पत्नी असल्याचे शेजाऱ्यांना सांगितले होते. यानंतर त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

सहा महिन्यांपूर्वी त्याचा लहान भाऊ अब्दुला यानेही तिच्यावर बलात्कार केला. दोन्ही मामांनी तिला धमकी देत अत्याचार सुरुच ठेवला. किरकोळ कारणावरुन ३० जून रोजी रात्री या दोघांनी तिला मारहाण केली. अखेर पिडीत तरुणीने मामाचा मोबाईल मिळवत वडिलांशी संपर्क साधुन वाळूज एमआयडीसीत बोलावून घेतले.

पिडीत तरुणीचे वडील गुरुवारी रांजणगावात आल्यानंतर तिने आपबिती कथन केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत युवतीच्या वडिलांनी तिला सोबत घेऊन एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन शहारुख खान व अब्दुल्ला खान याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Rages have been tortured in Ranjanga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.