बिल्डिंग निरीक्षक असल्याची बतावणी करून तोतयेगिरी करणाऱ्याला सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:40 PM2019-02-11T22:40:37+5:302019-02-11T22:41:08+5:30

महापालिकेचा बिल्ंिडग निरीक्षक असल्याची बतावणी करून वडा-पाव विक्री करणाºयाला ५०० रुपयांचा गंडा घालणारा ईश्वर हिरामण सातदिवे (४५, रा. रेणुकानगर, गारखेडा) याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी ५ महिने सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. दंडाच्या रकमेपैकी एक हजार रुपये फिर्यादीला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशात म्हटले आहे.

Prosecutor's rigorous imprisonment by pretending to be a building observer | बिल्डिंग निरीक्षक असल्याची बतावणी करून तोतयेगिरी करणाऱ्याला सश्रम कारावास

बिल्डिंग निरीक्षक असल्याची बतावणी करून तोतयेगिरी करणाऱ्याला सश्रम कारावास

googlenewsNext

औरंगाबाद : महापालिकेचा बिल्ंिडग निरीक्षक असल्याची बतावणी करून वडा-पाव विक्री करणाºयाला ५०० रुपयांचा गंडा घालणारा ईश्वर हिरामण सातदिवे (४५, रा. रेणुकानगर, गारखेडा) याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी ५ महिने सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. दंडाच्या रकमेपैकी एक हजार रुपये फिर्यादीला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशात म्हटले आहे.
यासंदर्भात वडा-पाव विक्रीचा व्यवसाय करणारे गजानन चुन्नीलाल बसैये (४०, रा. शिवाजीनगर) यांनी तक्रार दिली होती की, २३ जुलै २०१६ रोजी दुपारी शिवाजीनगर रेल्वेपटरीजवळ बसैये हातगाडीवर वडा-पाव विक्री करीत होता. त्यावेळी आरोपी सातदिवे तेथे गेला. त्याने हातगाडी कशी लावली, मला ओळखता का, मी महापालिकेत बिल्ंिडग निरीक्षक आहे. तुला येथे हातगाडी लावायची असेल तर एक हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. बसैये यांनी सातदिवे याला ५०० रुपये दिले. त्यानंतर आरोपी बाजूच्या गॅरेजवर गेला. गॅरेजमालक आनंद देसाई यांनादेखील आरोपीने तो बिल्ंिडग निरीक्षक असल्याची बतावणी करून दोन हजार रुपयांची मागणी केली. देसाई यांना शंका आल्याने त्यांनी नगरसेवकाच्या कार्यालयातील सुरेश पाटे यांना फोन करून याबाबत सांगितले. पाटे यांनी याबाबत महापालिकेकडे विचारणा केली असता, सातदिवे हा तोतया असल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळी विशेष सहायक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी ५ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला ‘लोकसेवक असल्याची बतावणी करून तोतयेगिरी केल्याच्या’ आरोपाखाली वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला. अभियोग पक्षाला पैरवी अधिकारी मंजूर हुसेन यांनी सहकार्य केले.
-------------

Web Title: Prosecutor's rigorous imprisonment by pretending to be a building observer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.