संलग्नीकरण समित्यांवर वर्णी लावण्यासाठी प्राध्यापकांची लॉबिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:12 PM2019-04-16T23:12:20+5:302019-04-16T23:12:45+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचे आगामी २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी संलग्नता कायम ठेवण्यासाठी आगामी आठवड्यात समित्या पाठविण्यात येणार आहेत. या समित्यांवर वर्णी लावण्यासाठी प्राध्यापकांनी मोठी लॉबिंग सुुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Professors' lobbying for coaching affiliation committees | संलग्नीकरण समित्यांवर वर्णी लावण्यासाठी प्राध्यापकांची लॉबिंग

संलग्नीकरण समित्यांवर वर्णी लावण्यासाठी प्राध्यापकांची लॉबिंग

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यापीठ : नियम डावलून निवड करण्यासाठी प्रकुलगुरूंवर दबाव

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचे आगामी २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी संलग्नता कायम ठेवण्यासाठी आगामी आठवड्यात समित्या पाठविण्यात येणार आहेत. या समित्यांवर वर्णी लावण्यासाठी प्राध्यापकांनी मोठी लॉबिंग सुुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रत्येक वर्षी समित्या पाठविण्यात येतात. यावर्षी व्यवस्थापन परिषदेने ज्या महाविद्यालयांचे ‘नॅक’कडून मूल्यांकन झालेले आहे. त्याच महाविद्यालयातील प्राध्यापकांना संलग्नता समित्यांवर पाठविण्याचा ठराव मंजूर केला आहे. या ठरावाची अंमलबजावणी होणे अत्यावश्यक असताना हा नियम डावलून समित्यांवर पाठविण्यासाठी विविध गट प्रयत्न करीत आहेत. विद्यापीठाशी संलग्न ४०० पेक्षा अधिक महाविद्यालयांपैकी केवळ ११८ महाविद्यालये अनुदानित आहेत. त्यातील अवघ्या ७४ महाविद्यालयांनी ‘नॅक’कडून मूल्यांकन करून घेतले आहे. विनाअनुदानित महाविद्यालयांपैकी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच महाविद्यालयांनी मूल्यांकन केले आहे. त्यामुळे मूल्यांकन केलेल्या ७८ महाविद्यालयांतील प्राध्यापकांनाच संलग्नता समित्यांवर संधी मिळणे अपेक्षित आहे. मात्र, व्यवस्थापन परिषदेने केलेल्या नियमांना डावलून समित्यांवर पाठविण्यासाठी एक गट कार्यरत झाला आहे. त्याचवेळी विरोधी गटाने नियमाप्रमाणे समित्यांवर सदस्य निवडण्यात यावेत, तसेच समितीचा अध्यक्ष प्राचार्य, सहयोगी प्राध्यापकच असावा, समितीच्या सदस्यांमध्ये अध्यापनाचा ६ वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव असला पाहिजे, हे नियम दाखविले आहेत. मात्र, या नियमांनाही तिलांजली देण्यात येत असल्याचे समजते. अधिष्ठातांनी बनविलेल्या समित्यांच्या नावांमध्ये काही जण बदल करण्याच्या प्रयत्नात आहेत, तर अधिष्ठातांनी बनविलेल्या समित्या अतिशय चुकीच्या पद्धतीच्या असल्याचा आक्षेप व्यवस्थापन परिषदेच्या एका सदस्याने केला आहे. विद्यापीठातील शैक्षणिक विभाग आणि प्रकुलगुरूंच्या दालनासमोर समित्यांमध्ये नाव टाकण्यासाठी प्राध्यापकांचे टोळके दिसून येत आहे.
चौकट,
‘पाकिटा’साठी ही धडपड
विद्यापीठाशी संलग्न बहुतांश विनाअनुदानित महाविद्यालयांत नियमाप्रमाणे आवश्यक असलेल्या पायाभूत सेवा-सुविधा उपलब्ध नाहीत. अनेक महाविद्यालयांमध्ये छोट्याशा टपऱ्या, शटरमध्ये चालतात. मात्र, संलग्नता समित्या महाविद्यालयात सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे सकारात्मक अहवाल देतात. यासाठी समित्यांच्या सदस्यांना स्वतंत्रणे पाकीट दिले जाते, अशी चर्चा प्राध्यापकांमध्ये होते. सर्वांत बोगस महाविद्यालयात जाण्यासाठी बहुतांश जणांची स्पर्धा असते. अशा महाविद्यालयात ‘जाडजूड’ पाकीट मिळते, असेही बोलले जाते. या पाकीट संस्कृतीमुळेच समित्यांवर जाण्यासाठी प्राध्यापकांमध्ये स्पर्धा असल्याचे एका अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
कोट,
महाविद्यालयांना आगामी शैक्षणिक वर्षात संलग्नता देण्यासाठी समित्या पाठविण्याची तयारी सुरू आहे. एकही समिती चुकीच्या पद्धतीने निवडली जाणार नाही. व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या ठरावाची, नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल.
- डॉ. अशोक तेजनकर, प्रकुलगुरू

Web Title: Professors' lobbying for coaching affiliation committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.