प्राध्यापिकेचा राहत्या घरी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 01:25 AM2017-08-24T01:25:58+5:302017-08-24T01:25:58+5:30

मॉडर्न डी. एड. कॉलेजमध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापिकेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बुधवारी सकाळी आढळल्याने खळबळ उडाली.

Professor death of residence | प्राध्यापिकेचा राहत्या घरी मृत्यू

प्राध्यापिकेचा राहत्या घरी मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मॉडर्न डी. एड. कॉलेजमध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापिकेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बुधवारी सकाळी आढळल्याने खळबळ उडाली. ही घटना जुनाबाजार येथील अमोदी कॉम्प्लेक्समध्ये घडली.
लुबना शेख महंमद जुनेद (४४) असे मृत प्राध्यापिकेचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, प्रा. लुबना शेख या अमोदी कॉम्प्लेक्समधील फ्लॅट क्रमांक १३ मध्ये पतीसह राहत होत्या. त्यांचे पती बाँम्बे मर्कंटाईल बँकेत कार्यरत आहेत. ते रविवारपासून घरी गेले नव्हते. रात्रीपासून घरातून दुर्गंधी येत असल्याने याबाबतची माहिती शेजाºयांनी शेख महंमद जुनेद यांना दिली. २३ आॅगस्ट रोजी सकाळी महंमद जुनेद हे घरी गेले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा ठोठावल्यानंतरही आतून प्रतिसाद मिळत नसल्याने आणि घरातून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी सिटीचौक पोलिसांना बोलावून घेतले. पोलीस उपनिरीक्षक योगेश धोंडे यांनी शेजाºयांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी घरातील एका खोलीत प्रा.लुभना मृतावस्थेत पडलेल्या दिसल्या. मृतदेह कुजल्याने त्यातून दुर्गंधी येत होती. यावेळी प्रथम पोलिसांच्या वाहनातून मृतदेह घाटीतील शवविच्छेदनगृहात हलविण्यात आला. मृत प्रा. लुबना यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा आजार होता, अशी माहिती त्यांच्या पतीने पोलिसांना दिली.
शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण समोर येईल, अशी माहिती सहायक पोलीस उपनिरीक्षक हरीष खटावकर यांनी दिली. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेमागे अन्य काही कारण आहे का, याचाही पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Professor death of residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.