तुळजापूर : भरधाव वेगातील खाजगी बसने पोलिसांच्या जीपला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह पोलीस कर्मचारी व १६ प्रवाशी जखमी झाले़ हा अपघात सोमवारी रात्रीच्या सुमारास तुळजापूर- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सिंदफळ पाटीजवळ घडला असून, या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि मिर्झा बेग व त्यांचे सहकारी सोमवारी रात्री पोलीस वाहनातून (क्ऱएम़एच़२५- सी़ ६४१८) पेट्रोलिंग करीत होते़ पेट्रोलिंग दरम्यान त्याची जीप तुळजापूर- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सिंदफळ पाटीजवळील गतीरोधकावर आली असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या खाजगी बसने (क्ऱएम़एच़०४- जी़७७९८) जोराची धडक दिली़ या अपघातात जीपमधील सपोनि मिर्झा बेग यांच्यासह पोकॉ सतीश पवार हे जखमी झाले़ तर जीपमधील देविदास राजेंद्र घोडके (वय-२५), पद्मिनबाई संग्राम घोडके (वय-३५), बालाजी बाबुराव गुडसुरे (वय-३५ तिघे रा़ गव्हाण ता़ जळकोट), राचप्पा मल्प्पा अलसर (वय-४०), सिद्राम्मा राचप्पा अलसर (वय-३५ दोघे रा़ हडलगी, विजापूर), गौतम भिवाजी रणदिवे (वय-४६), करूणा गौतम रणदिवे (वय-४० दोघे रा़ टी़पी़एस़रोड, उस्मानाबाद), सरूबाई धनसिंग जंबीगे (वय-५० रा़ विजापूर), पार्वती विठ्ठल नामवाड (वय-५०), विठ्ठल शमृत नामवाड (वय-३५), पद्मिनबाई रोहिदास गायकवाड (वय-५०- तिघे रा़ हळदवाडवणा जि़लातूर), सुरेश बसवण्णा रेखा (रा़ इंदी विजापूर), निर्मला संग्राम वाघमारे (वय-३५), संग्राम दशरथ वाघमारे (वय- ३५), सखुबाई दशरथ वाघमारे (वय-६५), दशरथ किसन वाघमारे (वय- ६५ सर्व रा़ रावणकुळा ता़ जळकोट) याप्रकरणी पोकॉ सतीश पवार यांच्या फिर्यादीवरून खासगी बसचालक राजेंद्र कडुबा राऊत (रा़ अंबरहील जठवाडा रोड, हरसूल, औरंगाबाद) याच्याविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदरील घटनेचा अधिक तपास पोहेकॉ नाईकवाडी हे करीत आहेत़ (वार्ताहर)