केळीला १३०० रूपयांपर्यंत भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:14 AM2017-07-21T00:14:25+5:302017-07-21T00:20:56+5:30

कुरूंदा : परिसरात केळीच्या उत्पादनात वाढ झाली असून सरासरी १२०० ते १३०० रूपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे.

Prices for banana up to 1300 rupees | केळीला १३०० रूपयांपर्यंत भाव

केळीला १३०० रूपयांपर्यंत भाव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : परिसरात केळीच्या उत्पादनात वाढ झाली असून सरासरी १२०० ते १३०० रूपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. कुरूंदा भागात यावर्षी केळीच्या उत्पादनात मोठी वाढ झाली असून परिसरातील केळी दुसऱ्या राज्यातही विक्रीसाठी जात असल्याचे बघावयास मिळत आहे.
हिंगोली जिल्ह्यात सर्वाधीक केळीचे उत्पादन डोंगरकडा, कुरूंदा, गिरगाव, दांडेगाव, सुकळीवीर, जामगव्हाण, रेडगाव आदी भागात घेतले जाते. या भागातून इसापूर धरणाचा कालवा गेलेला असल्यामुळे येथील सिंचन व्यवस्थेमुळे बागायती क्षेत्र निर्माण झाले आहे. रमजान महिन्यात बाजारपेठेत केळीला मोठी मागणी होती. त्यावेळी केळीचे दर वधारले होते. त्या तुलनेत सरासरी सध्याच्या सरासरीत केळीला चांगला भाव मिळत असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत केळीला सध्या १२०० ते १३०० रूपये क्विंटल भाव मिळत

Web Title: Prices for banana up to 1300 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.