महामॅरेथॉन फिटनेस पार्टीची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:04 AM2017-11-18T00:04:16+5:302017-11-18T00:04:19+5:30

राज्यभरातील दिग्गज धावपटू, प्रतिष्ठित नागरिक आणि सेलिब्रिटींचा समावेश असणारी ‘लोकमत समूहा’तर्फे १७ डिसेंबर रोजी ऐतिहासिक शहरात लोकप्रिय ठरणारी औरंगाबाद महामॅरेथॉन होत आहे.

 The preparations for the great marathon fitness party | महामॅरेथॉन फिटनेस पार्टीची तयारी

महामॅरेथॉन फिटनेस पार्टीची तयारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्यभरातील दिग्गज धावपटू, प्रतिष्ठित नागरिक आणि सेलिब्रिटींचा समावेश असणारी ‘लोकमत समूहा’तर्फे १७ डिसेंबर रोजी ऐतिहासिक शहरात लोकप्रिय ठरणारी औरंगाबाद महामॅरेथॉन होत आहे. यासाठी उद्या, रविवारी १९ नोव्हेंबर रोजी फिटनेस पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे.
जनमानसात तंदुरुस्तीविषयी जागृती निर्माण व्हावी, हा लोकमत समूहाचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे फिटनेसचे महत्त्व रनर्सला समजावे या दृष्टिकोनातून लोकमत समूहातर्फे औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये आपला समावेश निश्चित करणाºया धावपटूंसाठी १९ नोव्हेंबर रोजी फिटनेस पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या फिटनेस पार्टीत सहभागी होणाºयांना लोकमत भवनच्या मागील प्रवेशद्वारातून प्रवेश मिळेल.
या फिटनेस पार्टीत भांगडा, झुंबा, पिलोझिंग, मसाला बॉलीवूड आणि संगीत यातून आणखी चांगली तंदुरुस्ती कशी होईल, याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त धावपटूंनी सहभाग नोंदवावा. त्यासाठी लोकमत भवन, रिगल लॉन येथे संपर्क साधावा. तसेच ज्या धावपटूंनी महामॅरेथॉनमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे, अशा धावपटूंनी फिटनेस पार्टीत सहभागी होण्यासाठी त्यांचा पास रिगल लॉन येथून आपल्या ताब्यात घ्यावा.
आपल्या मित्र, मैत्रिणी अथवा कुटुंबातील सदस्यांनादेखील फिटनेस पार्टीमध्ये सहभाग नोंदवायचा असेल अशांनीदेखील महामॅरेथॉनमध्ये आपला प्रवेश निश्चित करावा व फिटनेस पार्टीसाठीचा प्रवेश पास घ्यावा. धावपटू ६६६.ेंँेंं१ं३ँङ्मल्ल.ूङ्मे/ं४१ंल्लॅुंं िया संकेतस्थळावरही आपला महामॅरेथॉनमध्ये आॅनलाइन प्रवेश निश्चित करू शकतील. अधिक माहितीसाठी ०२४०-३०२१७०८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title:  The preparations for the great marathon fitness party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.