सिल्लोड तालुक्यातील १६५ पैकी १४० पाणी योजनांची वीज ‘गूल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:26 AM2018-02-22T01:26:30+5:302018-02-22T01:26:35+5:30

सहा कोटींचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने तालुक्यातील १६५ पैकी १४० पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केल्याने तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

 Power of 140 water schemes out of 165 'Gool' | सिल्लोड तालुक्यातील १६५ पैकी १४० पाणी योजनांची वीज ‘गूल’

सिल्लोड तालुक्यातील १६५ पैकी १४० पाणी योजनांची वीज ‘गूल’

googlenewsNext

श्यामकुमार पुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिल्लोड : सहा कोटींचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने तालुक्यातील १६५ पैकी १४० पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केल्याने तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
१६५ पाणीपुरवठा योजनांकडे महावितरण कंपनीचे तब्बल ५ कोटी ८३ लाख रुपये वीजबिल थकले आहे. त्यामुळे या वसुलीसाठी गेल्या आठ दिवसांत १४० पाणीपुरवठा योजनांची वीज महावितरणने ‘गूल’ केली आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहेत.
तालुक्यातील ११ गावात २२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर ११ गावांत आणखी टँकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामपंचायतींनी केली आहे. अजून ९ गावांत टँकर सुरू करण्याची मागणी आली आहे. नाटवी, आमसरी, मादनी, उंडणगाव, भराडी,पालोद, वांगी, मोढा, रहिमाबाद, दहीगाव, अंभई, कोटनांद्रा, धानोरा, केळगाव, सावखेडा, आधारवाडी, शिवना, खुपटा, जळकी बाजार, वडाळी, चांदापूर, मंगरूळ, आसडी, सराटी, हळदा, बोदवड, मुखपाठ या पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले आहे. टंचाईग्रस्त गावात प्रशासन टँकरद्वारे पाणीपुरवठा देण्याचा प्रयत्न करीत असताना महावितरण कंपनीने गावकºयांना ‘शॉक’ दिल्याने नाराजी वाढली आहे.
महावितरणच्या एकूण थकीत १० कोटी ८३ लाख रुपयांपैकी १ कोटी ५० लाख रुपये आठ दिवसांत वसूल झाले आहे. त्यात पाणीपुरवठा योजनेकडून ११ लाख तर इतर ग्राहकांकडून मिळून एकूण १ कोटी ५० लाख रुपये वसूल झाले असल्याचे अधिकार यांनी सांगितले.
तालुक्यातील १४० पैकी ४० पाणीपुरवठा योजनांचे बिल भरले आहे. त्यामुळे तासगाव, अजिंठा, वसई, मंगरूळ, गव्हाली, भवन, मोढा, पिरोला, लोणवाडी, कासोद म्हसला खुर्द, बोरगाव बाजार, बोरगाव सारवणी, उपळी, घाटनांद्रा, चारनेर, पेंढगाव,खुपटा, गोळेगाव, लिहाखेडी, मांडणा आदी ४० पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन पूर्ववत सुरू करण्यात आले. अजूनही तालुक्यातील १०० पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन कट आहे. लवकर थकबाकी भरून सहकार्य करावे.
-एस. बी. अधिकार, उपविभागीय अभियंता, महावितरण
४सिल्लोड तालुक्यात २६ हजार २०० शेतकरी वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडून मागील तीन महिन्यात ३ कोटी ५० लाख रुपये वसूल करण्यात आले असले तरी अजून ५३ कोटी ५० लाख रुपये बाकी आहे.
-एस. बी. अधिकार,
उपविभागीय अभियंता महावितरण सिल्लोड

Web Title:  Power of 140 water schemes out of 165 'Gool'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.