पोलीस निरीक्षक निलंबित, डीवायएसपींची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 01:16 AM2017-09-22T01:16:48+5:302017-09-22T01:16:48+5:30

नितीन कटारिया खून प्रकरणात गुरुवारी रात्री तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना निलंबित करण्यात आले

Police inspector suspended, DYSP inquiry | पोलीस निरीक्षक निलंबित, डीवायएसपींची चौकशी

पोलीस निरीक्षक निलंबित, डीवायएसपींची चौकशी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील व्यावसायिक नितीन कटारिया खून प्रकरणात गुरुवारी रात्री तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना निलंबित करण्यात आले, तर जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी व सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी सांगितले.
नितीन कटारिया यांनी सहा महिन्यांपूर्वीच आपल्या जिवाला धोका असल्याची लेखी तक्रार तालुका जालना पोलीस ठाण्यात दिली होती.
या संदर्भात कटारिया यांनी वारंवार विनंती करून पोलिसांकडे संरक्षण मागितले होते. संशयित आपणास ५० लाखांची खंडणी मागत असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रारही त्यांनी तालुका ठाण्यात दिली होती. मात्र, पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. मागील महिन्यात कटारिया यांनी वरिष्ठ अधिकाºयांसह मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. दरम्यान, मंगळवारी
सकाळी न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणातील काही संशयितांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर घराकडे परतत असतानाच कटारिया यांच्यावर हल्ला झाला. दरम्यान, या संदर्भात बुधवारी राज्यमंत्री खोतकर यांनी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे व पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांची बैठक घेतली. अगोदरच खबरदारी घेतली असती तर हा प्रकार घडलाच नसता, अशी संतप्त भावना व्यापारी वर्गाने व्यक्त केली होती. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनीही गुरुवारी रात्री जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांक्षी बैठक घेऊन तपासाचा आढावा घेतला. त्यानंतर या प्रकरणास जबाबदार असणाºया अधिकाºयांवर कारवाईचे आदेश त्यांनी दिले. पोलीस अधीक्षक पोकळे यांनी गुुरुवारी रात्री तालुका जालना पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना निलंबित केले. रात्री उशिरा हे निलंबनाचे आदेश काढण्यात आले. तसेच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक लता फड या अधिकाºयांची चौकशी करणार आहेत.
शहरात आज मूकमोर्चा
कटारिया व गगराणी प्रकरणाचा गुरुवारी जैन समाजाकडून गुरुवारी आयोजित सभेत निषेध करण्यात आला. आरोपींना अटक करावी व खटला जलदगती न्यायालयात चालवावा या मागणीसाठी शुक्रवारी गुरुगणेश भवन ते गांधी चमनपर्यंत जनआक्रोश मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नितीन कटारिया यांची सुपारी देऊन हत्या ?
कटारिया यांची हत्या सुपारी देऊन केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी आता त्या दिशेने तपास सुरू केला आहे. कटारिया यांचा मारेकरी निष्पन्न झाला असून, तो जालना तालुक्यातील असल्याचे समजते. हनीफ बुºहाण घोचिवाले, अकबर बुºहाण घोचिवाले, सलीम बुºहाण घोचिवाले या तिघांना रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्यांची संख्या आता आठवर गेली असून, पोलीस त्यांची चौकशी करीत आहेत.

Web Title: Police inspector suspended, DYSP inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.