पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखविणाऱ्यास पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 09:16 PM2019-07-04T21:16:45+5:302019-07-04T21:16:57+5:30

पैशांचा पाऊस पाडुन कोट्यवधी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवणारा आरोपी साहेब खान यासीन खान पठाण (५३, रा. नारेगाव) याला गुरुवारी (दि. ४) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.एच. जोशी यांनी ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

The police custody who showed the lure of money | पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखविणाऱ्यास पोलीस कोठडी

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखविणाऱ्यास पोलीस कोठडी

googlenewsNext

औरंगाबाद : पैशांचा पाऊस पाडुन कोट्यवधी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून हैद्राबाद येथील एका मेकॅनिकची साडे आठ लाखांची फसवणूक करणारा आरोपी साहेब खान यासीन खान पठाण (५३, रा. नारेगाव) याला गुरुवारी (दि. ४) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.एच. जोशी यांनी ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.


यासंदर्भात डोडू सत्यनारायण डोडू जंगैया (४१, रा. न्यू एलबी नगर, हैदराबाद) यांनी तक्रार दिली होती. सहाय्यक सरकारी वकील ए.व्ही. घुगे यांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.

 

Web Title: The police custody who showed the lure of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.